Aaditya Thackeray : मुख्यमंत्री महोदय, जेन झीनं स्क्रीनवर नसायला पाहिजे आणि मैदानांवर असावं पण तुम्ही मैदानं ठेवताय कुठे? : आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray : मुंबईतील मैदानांसाठी आणि मुंबईसाठी सर्वांना मतभेद विसरुन एकत्र यावं लागेल, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईतील मोकळी मैदाने वाचवूया हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. वांद्रे येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानाचं आरक्षण बदलू नये यासाठी आज आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या उपस्थितीत तिरंगा आंदोलन करण्यात आलं.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेनझीनं स्क्रीन पेक्षा मैदानावर असावं, असं म्हटलं पण तुम्ही मैदानं ठेवताय कुठे असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. मुंबईची मैदानं आणि मुंबई वाचवण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरत तिरंगा हाती घेत एकत्र यावं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
17 मैदानांचं आरक्षण बदललं : आदित्य ठाकरे
आज आपण इथे जमलेलो आहोत ते मुंबईची मोकळी मैदान, मुंबईची रिक्रीएशन ग्राऊंड, प्ले ग्राऊंड ही मैदानंच राहिली पाहिजेत, त्यावर काँक्रिट टाकलं नाही पाहिजे, हे ठरवण्यासाठी आपण जमलो आहोत. गेल्या चार वर्षात ही मुंबई बदलायला लागली आहे. चार वर्षात 17 हून अधिक मैदानं निवासी किंवा कर्मशिअल करण्यात आली आहे. 2017 मध्ये मुंबईचा 2034 चा डेव्हलपमेंट प्लॅन बनला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी नगरसेवक आणि महापौरांना एकही मैदान बिल्डर आणि ठेकेदाराच्या हातात द्यायचं नाही, असं सांगितलं होतं. मैदान हे मैदान राहिलं पाहिजे, अशी भूमिका घेतली होती, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदान या मैदानाची मूळ जागा 2.58 हेक्टर होती 6 एकर होती, हे एक खेळाचं मैदान होतं.मैदानं वाचवण्याची लढाई आज सुरु झाली आहे.मोकळी मैदानं वाचवण्यासाठी मोठा मुंबईकर वर्ग रस्त्यावर उतरणार आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आम्ही स्वच्छ केलं आणि तिथे मैदान केलं. अंधेरीचं स्पोर्टस कॉम्लेक्स 21 लाख प्रति वर्ष एका संस्थेला दिलं आहे. म्हाडाचे तीन प्लॉट भाजपच्या एका आमदाराच्या संस्थेला फुकट दिले आहेत.आम्ही आमच्या मैदानासाठी का पैसे मोजू असा सवाल केला, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पालिकेने घेतलं सेट झेवियर्स कॉम्प्लेक्स देखील घेण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्री जेन झी बद्दल बोलत होते. मुलांनी स्क्रीन वर नाही तर मैदानावर असायला पाहिजे पण मुख्यमंत्री साहेब तुम्ही मैदान ठेवताय कुठे असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. आजुबाजूचं सगळ मित्राच्या आणि भाजपच्या आमदारांच्या घश्यात घातलं आहे. मुलुंड मध्ये देखील ते सुरू आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबईच्या मोकळ्या जागांसाठी आम्ही लढणार आहोत. उच्च न्यायालयानं परिस्थिती जैसे ठेवण्याचे आदेश दिल्यानं त्यांचे आभार मानतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, आदित्य ठाकरे आणि उपस्थित आंदोलकांकडून रेड कार्ड दाखवत सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.आम्ही सगळे मिळून सरकारला रेड कार्ड दाखवत आहोत, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
Before You Go
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले





















