Nagpur Panchayat Samiti Elections : प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात भाजपला धक्का, 13 पंचायत समितीत एकही सभापती नाही
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्ह्यात पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपची (BJP) पाटी कोरी राहिली असून फक्त दोन तालुक्यात उपसभापती पदावर भाजपला समाधान मानावे लागले आहे.
Nagpur News : नागपूर जिल्ह्यात झालेल्या पंचायत समिती सभापती (Chairman of Panchayat Samiti) उपसभापती पदाच्या निवडणुकांमध्ये भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. नागपूर जिल्ह्यातील (Nagpur News) 13 तालुक्यांमध्ये भाजपला एकही पंचायत समितीवर सभापती होऊ शकला नाही. फक्त दोन तालुक्यात उपसभापती पदावर भाजपला समाधान मानावे लागले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या जिल्ह्यात पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपची (BJP) पाटी कोरी राहिली आहे. तर दुसरीकडे संख्याबळाच्या आधारावर काँग्रेसला मोठz यश मिळाले आहे.
13 पंचायत समितींपैकी 9 पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे सभापती
जिल्ह्यातील 13 पंचायत समितींपैकी 9 पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे (INC) सभापती निवडून आले आहे. तर तीन तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) सभापती झाला आहे. तर एका तालुक्यात शिंदे गटाचा (Eknath Shinde) सभापती झाला आहे. पंचायत समितीमध्ये सभापती, उपसभापती निवडणुकांसाठी भाजपतर्फे कॉंग्रेसच्या नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर राष्ट्रवादीचेही काही नेते संपर्कात होते.
'या' पंचायत समित्यांवर कॉंग्रेस राज
कॉंग्रेसला सभापतीपद मिळालेल्या पंचायत समित्यांमध्ये जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण, कामठी, सावनेर, कळमेश्वर पारशिवनी, उमरेड, मौदा, कुही, भिवापूर या पंचायत समितींचा सामवेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती झालेली पंचायत समित्यांमध्ये नरखेड, काटोल व हिंगणा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस विजय मिळवला आहे. तर शिवसेनेच्या शिंदे गटाला रामटेक पंचायत समितीत सभापती पद मिळाले आहे. यासोबतच रामटेक आणि मौदा तालुक्यात भाजपला उपसभापती पद मिळाले आहे.
काटोल नरखेड पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम
आज झालेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये काटोल व नरखेड येथील पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती विजयी झाले आहेत. यात नरखेड पंचायत समितीमध्ये महेंद्र गजबे हे सभापतीपदी बिनविरोध तर उपसभापती पदी माया प्रवीण मुढोरिया 6 विरुद्ध 2 मतांनी विजय झाले. तर काटोल पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय डांगोरे हे सभापती तर उपसभापतीपदी निशिकांत नागमोते हे बिनविरोध निवडून आले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या