82 गेहलोत समर्थक आमदार राजीनामा देण्याची शक्यता, सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करायला विरोध?
Rajasthan Congress Legislative Party Meeting: राजस्थानमध्ये पुन्हा एकदा मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेदरम्यान आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे.
Rajasthan Congress Legislative Party Meeting: राजस्थानमध्ये पुन्हा एकदा मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेदरम्यान आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर नेतृत्व बदलाबाबत चर्चा होत आहे. या बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्षांनी मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांना निरीक्षक आणि प्रभारी बनवले आहे. ही विधीमंडळ पक्षाची बैठक काही वेळात सुरू होऊ शकते. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह 25 आमदार गेहलोत यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत. हे सर्व सचिन पायलट गटाचे आणि इतर काही आमदार आहेत.
गेहलोत यांचे समर्थक आमदार राजीनामा देऊ शकतात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेहलोत गटाचे सर्व आमदार शांती धारीवाल यांच्या घरातून राजस्थानचे सभापती सीपी जोशी यांच्या घरी जाऊ शकतात. गेहलोत समर्थक आमदारांनी सामूहिक राजीनामे दिल्याची चर्चा आहे. सुमारे 82 आमदारांनी त्यांचे राजीनामे लिहले असून ते सभापतींच्या घरी नेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत बोलताना प्रताप सिंह खाचरियावास म्हणाले की, सर्व आमदार नाराज असून राजीनामा देत आहेत. त्यासाठी पक्षाध्यक्षांकडे जाणार आहोत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी सल्लामसलत न करता निर्णय कसा घेऊ शकतात, यावर आमदार नाराज आहेत.
या बैठकीसाठी काँग्रेसचे आमदार राजेंद्रसिंह गुढा हेही पोहोचले आहेत. राजेंद्र सिंह गुढा यांनी बैठकीपूर्वी सांगितले होते की, जर सर्व 101 आमदार सीएलपीच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत तर सरकार बहुमत गमावणार नाही का? मी या बैठकीला उपस्थित नाही. माझ्या घरी आमदार उपस्थित आहेत. आपण काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत आमदारांनी म्हटले आहे की, जर मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून केंद्रात गेले आणि त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्या 102 आमदारांपैकी कोणालाही मुख्यमंत्री बनवा जे सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असलेल्या पायलट यांच्या विरोधात काँग्रेससोबत उभे होते. दरम्यान, गेहलोत यांनी राजीनामा दिल्यास सचिन पायलट यांना मुख्यमंत्री केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. यालाच गेहलोत गटाने विरोध केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
आयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले! शरद पवार, नितीश कुमार यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित
'गेहलोत कॅम्पचे 65 आमदार पायलट यांना मुख्यमंत्री करायला तयार नाही', गेहलोत घेणार पक्ष प्रभारींची भेट