एक्स्प्लोर

झारखंडच्या तीन आमदारांच्या गाडीत सापडली 49 लाखांची रोकड, पश्चिम बंगालमध्ये पोलिसांनी केली अटक

Jharkhand Cash Scandal: गाडीत रोख रक्कम सापडल्या प्रकरणी पोलिसांनी झारखंडमधील तीन आरोपी आमदारांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदारांकडून 49 लाख 98 हजार 300 रुपये मिळाले आहेत.

Jharkhand Cash Scandal: गाडीत रोख रक्कम सापडल्या प्रकरणी पोलिसांनी झारखंडमधील तीन आरोपी आमदारांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदारांकडून 49 लाख 98 हजार 300 रुपये मिळाले आहेत. या संपूर्ण तपासाचे व्हिडीओग्राफी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. झारखंडच्या तीन आमदारांसह चालक आणि आणखी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. रात्रभर चौकशी करूनही योग्य उत्तर न दिल्याने या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी पोलिसांनी इरफान अन्सारी, राजेश कछाप आणि नमन बिक्सल कोंगरी या तीन आमदारांच्या कारच्या तपासादरम्यान लाखोंची रोकड जप्त केली होती.

यापूर्वी काँग्रेसचे तीन आमदार डॉ इरफान अन्सारी, नमन बिक्सल कोंगरी आणि राजेश कछाप यांचे निलंबित केले आहे. झारखंड काँग्रेसचे प्रभारी आणि पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस अविनाश पांडे यांनी ही माहिती दिली आहे. तीन आमदारांवरील आरोप पाहता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वानी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एफआयआर नोंदवला

दरम्यान, राज्य सरकार पाडण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे बेरमो मतदारसंघाचे आमदार अनूप सिंह यांनी रविवारी सकाळी रांचीमधील अर्गोरा पोलिस ठाण्यात या तीन आमदारांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. तत्पूर्वी, शनिवारी संध्याकाळी उशिरा झारखंडमधील काँग्रेसचे तीन आमदार डॉ. इरफान अन्सारी, राजेश कछाप आणि नमन बिक्सल कोंगरी यांना पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातील पंचला पोलीस स्टेशनच्या राणी हाट येथे नोटांच्या पिशवीसह पकडण्यात आले. रात्री उशिरा नोटांची मोजणी केली असता एकूण रक्कम 49 लाख रुपये असल्याचे आढळून आले. हे तिन्ही आमदार अन्य दोन व्यक्तींसोबत एसयूव्हीमधून जात होते. गुप्त माहितीच्या आधारे पश्चिम बंगालच्या पोलिसांनी त्यांना तपासणीदरम्यान पकडले. या एसयूव्हीवर झारखंडच्या जामतारा आमदाराचा बोर्ड लावण्यात आला होता.

झारखंड काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते आलमगीर आलम म्हणाले की, पक्षाचा कोणताही आमदार पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतलेला आढळल्यास त्यांना तत्काळ निलंबित करण्यात येते. हे काँग्रेसच्या घटनेचे अधिवेशन आहे. तीनही आमदारांना पक्षाच्या घटनेच्या नियमानुसार निलंबित करण्यात आले आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तपासात जे काही बाहेर येईल, पक्ष त्याच निर्णयाच्या आधारे पुढील कारवाई करेल.

इतर महत्वाच्या बातम्या:

संजय पांडे यांच्यानंतर घोटाळेबाज संजय राऊत आता ईडीच्या ताब्यात: किरीट सोमय्या
ED Detain Sanjay Raut : संजय राऊत ईडीच्या ताब्यात, 9 तासांच्या चौकशीनंतर कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Big Fight Vidarabh Vidhansabha : नंदुरबार, नवापूर, सिंदखेडा विदर्भाच्या बिग फाईटShrikant Shinde Rally | प्रचाराचा शेवटचा दिवस, महायुतीसाठी श्रीकांत शिंदेंचा रोडशोSanjay Shirsat on Kalicharan : कालीचरण यांच्या सभेचा आणि माझा काहीही संबंध नाहीSaroj Patil speech Kagal : Hasan Mushrif नक्की गाडला जाणार, शरद पवारांच्या बहिणीचा हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Embed widget