(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारत जोडो यात्रेचे 100 दिवस, 2800 किलोमीटरचा प्रवास पूर्ण; पाच राज्यांच्या यात्रेनंतर राहुल गांधी आता राजस्थानामध्ये
Congress Rahul Gandhi Yatra: खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेला आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत.
Congress Rahul Gandhi Yatra: खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेला आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत. शुक्रवारी (16 डिसेंबर) राहुल गांधी यांनी यावेळी पुन्हा एकदा भाजप सरकारवर निशाणा साधला. राहुल यांनी ट्विटरवर लिहिले की, "बेरोजगारी, द्वेष, महागाई विरोधात आमची ही तपस्या कोणीही रोखू शकले नाही आणि थांबवूही शकणार नाही."
राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. आज 16 डिसेंबर रोजी राहुल यांच्या पदयात्रेला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. यादरम्यान राहुल गांधींचा हा प्रवास अनेक राज्यांमधून पार करून राजस्थानमध्ये पोहोचला आहे. आतापर्यंत राहुल गांधींनी राजस्थानमध्ये 70 टक्के प्रवास पूर्ण केला आहे. यानंतर अलवर येथून काँग्रेसची भारत जोडो यात्रा हरियाणात दाखल होईल. आज भारत जोडो यात्रा एकाच टप्प्यात 22 किलोमीटर अंतर कापणार आहे.
100 days of Bharat Jodo Yatra: भाजप आणि आरएसएसवर हल्ला
राहुल गांधी यांनी आपल्या 100 दिवसांच्या आतापर्यंतच्या दौऱ्यात 8 राज्यांतील 42 जिल्ह्यांमध्ये 2800 किलोमीटर पायी यात्रा केली आहे. यादरम्यान त्यांनी तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, ओडिशा, मध्य प्रदेश असा पायी प्रवास केला. सध्या भारत जोडो यात्रा राजस्थानच्या विविध भागातून जात आहे. यादरम्यान राहुल गांधी केवळ जनतेशी थेट संवाद साधत नाहीत, तर केंद्र सरकारवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही आहेत.
बेरोज़गारी के खिलाफ़
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 16, 2022
महंगाई के खिलाफ़
नफ़रत के खिलाफ़
हमारी इस तपस्या को
न कोई रोक पाया है, न रोक पाएगा!#100DaysOfYatra pic.twitter.com/EyQKLcY11w
भाजप आणि आरएसएसवर हल्ला
राहुल गांधी यांनी आपल्या 100 दिवसांच्या आतापर्यंतच्या दौऱ्यात 8 राज्यांतील 42 जिल्ह्यांमध्ये 2800 किलोमीटर पायी यात्रा केली आहे. यादरम्यान त्यांनी तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, ओडिशा, मध्य प्रदेश असा पायी प्रवास केला आहे. सध्या भारत जोडो यात्रा राजस्थानच्या विविध भागातून जात आहे. यादरम्यान राहुल गांधी केंद्र सरकारवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. राहुल गांधी यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजप सरकारवर निशाणा साधला होता. राहुल यांनी आरएसएस महिलांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. त्यांनी दावा केला की, यामुळेच संघटनेत महिला सदस्य नाहीत.