एक्स्प्लोर

शेतकऱ्यांच्या आंदोलनात राजकीय पक्षांचा शिरकाव

नागपूर : शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात राजकीय पक्षांनी शिरकाव केला आहे. नागपुरात आज दिवसभरात तीन आंदोलनं झाले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते उघड स्वरुपात दिसून आले. तर विदर्भवाद्यांनी बळजबरीने अनेक ठिकाणी दुकानं बंद केली. विशेष म्हणजे काही कार्यकर्त्यांनी केवळ फोटो काढण्यापुरतंच आंदोलन केल्याचंही दिसून आलं. शेतकऱ्यांपेक्षा राजकीय कार्यकर्त्यांचीच गर्दी नागपूरच्या दिघोरी चौकावर जय जवान जय किसान या संघटनेने आंदोलन केलं. कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातून नागपुरात आणलेलं दुधाचे टँकर अडवलं आणि हजारो लिटर दूध भर चौकात जमिनीवर ओतून दिलं. शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन केलं असलं तरी या आंदोलनाचं नेतृत्व मनसेचे पूर्व नेते प्रशांत पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान नगरसेवक दूणेश्वर पेठे हे करत होते. त्यामुळे शेतकऱ्यांऐवजी त्यांच्याच कार्यकर्त्यांची गर्दी या आंदोलनात होती. फोटोसेशन संपलं की आंदोलनही आटोपलं दुसरं आंदोलन आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या बाजार समितीत म्हणजेच कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत पार पडलं. या ठिकाणी विदर्भवादी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाजार समिती बंद केली. विशेष म्हणजे माध्यमं उपस्थित असताना काही केवळ कॅमेऱ्यासमोरच हे आंदोलन करण्यात आलं. कारण बाजार समितीच्या बंद केलेल्या गेटवर कार्यकर्त्यांनी फोटोसेशन आटोपून घेतलं. मात्र बाजार समितीचं दुसरं गेट सुरु असल्याने वाहनांची ये जा सुरुच होती. राजकीय कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं गांभीर्य कमी करत आहेत का, असा सवाल केल्यानंतर भाजपवालेही विरोधात असताना असंच करायचे असं उत्तर देण्यात आलं. विदर्भवाद्यांकडून जबरदस्तीने दुकाने बंद नागपुरातील तिसरं आंदोलन तुकडोजी चौक परिसरात पार पडले. या ठिकाणी विदर्भवाद्यांनी बाजारातून आधीच खरेदी करून आणलेली भाजी रस्त्यावर फेकून आंदोलन उरकलं. यावेळी विदर्भवाद्यांनी दमदाटी करत अनेक ठिकाणी दुकाने बंद पाडली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत काही विदर्भवाद्यांना ताब्यात घेतलं. नागपुरात दिवसभर विविध राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी जी तीन आंदोलनं करण्यात आली, आणि ज्या पद्धतीने करण्यात आली, त्याकडे पाहता शेतकऱ्यांच्या आंदोलनातील ही राजकीय घुसखोरी शेतकऱ्यांना मदत करणारी ठरेल की त्यांच्या आंदोलनाचं गांभीर्य कमी करणारी ठरेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shubh Yog: आजचा श्रावणी शुक्रवार पॉवरफुल, पंचमहापुरुष राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग; तूळसह 5 राशींचे धनलाभाचे योग, कुबेराची कृपा..
आजचा श्रावणी शुक्रवार पॉवरफुल, पंचमहापुरुष राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग; तूळसह 5 राशींचे धनलाभाचे योग, कुबेराची कृपा..
Horoscope Today 14 August 2026 : आज शुक्रवारचा दिवस 7 राशींसाठी संकटाचा, तर, 5 राशी असतील निवांत, वेळोवेळी लागणार संकटाची चाहूल, आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस 7 राशींसाठी संकटाचा, तर, 5 राशी असतील निवांत, वेळोवेळी लागणार संकटाची चाहूल, आजचे राशीभविष्य
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget