एक्स्प्लोर

Government Decision : मोठी बातमी! केंद्र सरकारचे 'कडधान्य आत्मनिर्भरता अभियान' राज्यात राबविण्यास मंजुरी; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Self-Reliance in Pulses Mission : केंद्र सरकारच्या 'कडधान्य आत्मनिर्भरता अभियान' (Self-Reliance in Pulses Mission) राज्यात राबविण्यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.

Self-Reliance in Pulses Mission : केंद्र सरकारच्या 'कडधान्य आत्मनिर्भरता अभियान' (Self-Reliance in Pulses Mission) राज्यात राबविण्यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. फडणवीस सरकारने या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राज्यात राबविण्या मंजुरी दिली आहे. यात अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांची केंद्राकडून या अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. बियाणे खरेदी व उत्पादनासाठी 100 टक्के मदत केंद्र सरकार करणार असल्याची माहिती आहे. तर उरलेल्या उपाययोजनांसाठी ही केंद्र सरकार 60 टक्के मदत देणार आहे. 2025-2026 ते 2030-31 या पाच वर्षांत हे अभियान राबविले जाणार आहे. कडधान्य आयात कमी करत आत्मनिर्भरतेसाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Government Decision : शाना निर्णयात नेमकं काय म्हटलं?

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत असलेला कडधान्य हा घटक वगळून चालू वर्षाच्या रब्बी हंगामापासून कडधान्य घटकासाठी स्वतंत्र कडधान्य आत्मनिर्भरता अभियान (Mission for Aatmanirbharta in Pulses) राबविण्याचे धोरण केंद्र शासनाने निश्चित केले आहे. नवनिर्मित केंद्र पुरस्कृत, "कडधान्य आत्मनिर्भरता अभियान (Mission for Aatmanirbharta in Pulses)" सन 2025-2026 ते सन 2030-31 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. देशासाठी एकूण रु.11,440 कोटीची तरतूद मंजूर केली आहे असून या अभियानांतर्गत राज्यातील 34 जिल्ह्यांची निवड केली आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्याने, "कडधान्य आत्मनिर्भरता अभियान" (Mission For Aatmanirbharta in Pulse) राबविण्याचे धोरण निश्चित केले आहे. या अभियानास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेतले आहे.

- नवनिर्मित केंद्र पुरस्कृत "कडधान्य आत्मनिर्भरता अभियान" (Mission for Aatmanirbharta in Pulses) सन 2025-2026 ते सन 2030-31 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सदर अभियानाच्या अंमलबजावणीस या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

- कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत (Mission for Aatmanirbharta in Pulses), कडधान्य या घटकाखाली मूलभूत बियाणे खरेदी व पायाभूत बियाणे उत्पादन या बाबी 100% केंद्र हिश्श्याच्या असून उर्वरित बाबींमध्ये केंद्र व राज्य हिश्श्याचे प्रमाण अनुक्रमे 60:40 याप्रमाणे आहे.

-सदर अभियानाच्या अंमलबजावणीकरीता केंद्र व राज्य हिश्श्याचा निधी, प्रवर्गनिहाय 60:40 प्रमाणात व 100 टक्के केंद्र हिश्श्याचा निधी वेळोवेळी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे, आयुक्त (कृषि) यांना उपलब्ध करुन देण्यात येईल.

-केंद्र शासनाने सदर अभियानातंर्गत विहित केल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच, महिला शेतकरी लाभार्थ्यांना, सदर योजनेंतर्गत लाभ देण्यात यावा.

-केंद्रीय कृषी मंत्रालयाने, सदर अभियानांतर्गत राज्य शासनास, सन २०२५-२६ करिता वाचा क्र.२ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार, तसेच, चालू वर्षी अभियानाकरिता मंजूर केलेल्या कृती आराखड्यानुसार आणि वेळोवेळी केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार, सदर अभियानाची अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील. याबाबत संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी राज्यस्तरावरून अभियानाचे संनियंत्रण करावे. त्याप्रमाणे अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व संनियंत्रणाकरिता वेळोवेळी अधिनस्त कार्यालयांना निर्देशित करावे.

-सदर अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या वेळोवेळी प्राप्त सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
BMC Electin: मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
Savari Drugs Case : मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत व्हाया पुणे कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
Embed widget