एक्स्प्लोर

PM Modi Cabinet : रक्षा खडसेंनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ, मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातून एकमेव महिला

PM Modi Oath Taking Ceremony : रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी आज केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून त्या एकमेव महिला मंत्री ठरल्या आहेत.

PM Modi Oath Taking Ceremony : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राजधानी दिल्लीतील (Delhi) राष्ट्रपती भवन परिसरात दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान मोदींनंतर राजनाथ सिंह यांनी दुसऱ्य क्रमांकावर, अमित शाह यांनी तिसऱ्या क्रमांकावर तर, नितीन गडकरी यांनी चौथ्या नंबरवर शपथ घेतली. तर, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पाचव्या नंबरवर मंत्रिपदाची शपथ घेतली. रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. राष्ट्रपतींनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. रक्षा खडसे या मंत्रिमंडळातील दुसऱ्या सर्वात तरुण मंत्री ठरल्या आहेत. 

रक्षा खडसे यांचा जन्म 12 मे 1987 रोजी झाला होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांच्यासोबत झाले होते. निखिल खडसे यांनी आत्महत्या केल्यानंतर रक्षा खडसे यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. रक्षा खडसे यांनी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्या रावेरलोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. एनडीए सरकारमध्ये रक्षा खडसेंना केंद्रीय मंत्रि‍पदाची लॉटरी लागली आहे. रक्षा खडसेंना मंत्रि‍पदाची संधी मिळताच रावेरमध्ये जंगी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.  आता रक्षा खडसेंना कुठली जबाबदारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

रक्षा खडसेंची राजकीय वाटचाल

1. सरपंच कोथळी, तालुका. मुक्ताईनगर, जिल्हा- जळगाव, महाराष्ट्र

२. जिल्हा परिषद - जळगाव जिल्हा सदस्य आणि अध्यक्ष ( सभापती) आरोग्य विभाग, शिक्षण आणि क्रीडा समिती जिल्हा परिषद, जळगाव,

3. ⁠2014 ते 2019 पर्यंत पहिल्यांदा खासदार 

४. 2019 te 2014 पर्यंत दुसर्‍यांदा खासदार 

5 . 2024 साली तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. 

6. 09 जून 2024 रोजी रक्षा खडसे यांनी केंद्रीय मंत्रि‍पदाची शपथ घेतली.

जनतेच्या आशीर्वादामुळेच हे शक्य - एकनाथ खडसे

रक्षा खडसेंना मंत्रिपदाची संधी मिळाल्याबाबत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले की, रक्षाताईंना मंत्रीपद मिळत आहे. याचा आमच्या परिवाराला अतिशय आनंद आहे. सलग तीन वेळा रक्षाताई रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. यात त्यांनी अत्यंत चांगले काम केलेले आहे. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांची तिसरी टर्मही चांगली राहील. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे रक्षाताई आज उच्चपदापर्यंत जाऊ शकल्या. आमच्या परिवारातील एक सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळात जात आहे, याचा आम्हाला आनंद आहे. रक्षाताईंनी अनेक वर्ष केलेल्या श्रमाचे हे फळ आहे. त्याचबरोबर जनतेचे त्यांच्या पाठीशी असलेले आशीर्वाद यामुळे हे शक्य झाले आहे. देशाबरोबर आपल्या भागासाठी रक्षाताई नक्की योगदान देतील, असा विश्वास त्यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला. 

भर पावसातही कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

दरम्यान, दिल्लीत होणारा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी मुक्ताईनगर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती. या एलईडी स्क्रीनवर एबीपी माझाच्या माध्यमातून शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांना केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यामुळे रक्षा खडसे यांचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मुक्ताईनगर या ठिकाणी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भर पावसातही कार्यकर्त्यांनी रक्षा खडसे आनंदोत्सव साजरा केला. 

आणखी वाचा

Raksha Khadse : नाथाभाऊंच्या सुनबाई, सरपंच, सलग तीन वेळा खासदार ते आता केंद्रीय मंत्री, असा आहे रक्षा खडसेंचा राजकीय प्रवास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray interview :…म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाही!   उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखतPriyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
×
Embed widget