ST Bus : बसमध्ये 62 प्रवाशी, अन् धावत्या बसचा टायर निखळून 100 फूट लांब पडला; पुढे जे घडलं
Parbhani Bus Accident : धावत्या बसचा टायर निखळून थेट 100 फूट लांब गेला. यावेळी बसमध्ये 62 प्रवाशी होते. पण, पिकअप चालकाच्या प्रसंगावधानाने सर्व प्रवाशांचा जीव वाचला.
![ST Bus : बसमध्ये 62 प्रवाशी, अन् धावत्या बसचा टायर निखळून 100 फूट लांब पडला; पुढे जे घडलं Tire of running bus fell 100 feet 62 passengers on board What happened next Parbhani Bus Accident shocking news ST Bus : बसमध्ये 62 प्रवाशी, अन् धावत्या बसचा टायर निखळून 100 फूट लांब पडला; पुढे जे घडलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/10/8894e9e863b73a1d7bd6ae9daf4cd9b11691654315407322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ST Bus without Tier : राज्यातील परिवहन विभागाच्या बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मागील काही दिवसांपासून एसटी बसची (ST Bus) दूरवस्था दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत आहेत. कधी या बस अचानक बंद पडत आहेत तर, कधी बसचं पूर्ण छप्परच उडत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. परभणीत तर चक्क धावत्या बसचे चाकच निखळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परभणीच्या गंगाखेड-पालम राष्ट्रीय महामार्गावर घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेल्या भरधाव वेगात असलेल्या बसचं चाक निखळलं आणि 100 फूट लांब जाऊन पडलं. सुदैवाने बसमधून प्रवास करणाऱ्या 62 प्रवाशांचा जीव वाचला आहे. पण नक्की काय घडलं हे जाणून घ्या.
धावत्या बसचा टायर निखळला अन्
गंगाखेड आगाराची बस गंगाखेड हुन पालम कडे 62 प्रवासी घेऊन निघाली होते..गंगाखेड-पालम राष्ट्रीय महामार्गावरील केरवाडी जवळ धावत्या बसचे चाक निखळले..तरीही बस धावत होती.ही बाब याच रस्त्यावरून जात असलेल्या पीक अप चालक भागवत मुंडे यांना दिसली त्यांनी तात्काळ बस चालकाला हातवारे करून आवाज करून लक्षात आणून दिले तेव्हा बसचालक यांनी ही बस थांबवली...महत्वाचे म्हणजे या बसचा वेग जास्त असल्याने टायर चक्क 100 फुटांपर्यंत जाऊन पडले..सुदैवाने पीक अप चालक भागवत मुंडे यांनी ही गंभीर बाब लक्षात घेऊन बस चालकाच्या लक्षात आणून दिल्याने पुढील अनर्थ टळला.
छत तुटलं, तरीही एसटी नाही थांबली
एसटी महामंडळाच्या अनेक बस भंगार झाल्या आहेत. मात्र तरीही त्या रस्त्यांवर धावताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी गडचिरोलीमधील (Gadchiroli) लालपरीचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील एसटीचा पत्रा हा हवेत उडाला आहे. तरी या एसटीचा (ST) चालक ही बस भरधाव वेगाने चालवत आहे. सर्वसामान्यांचं प्रवासाचं हक्काचं साधन म्हणजे, लालपरी. मात्र त्याच लालपरीमधून प्रवास करणं गडचिरोलीमधील प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आहे. यामध्ये महामंडळाच्या एसटीचे छत उडाले तरी एसटी भरधाव वेगामध्ये सुसाट धावत होती. सध्या राज्यात एसटी महामंडाळाची स्थिती फार बिकट आहे. त्यातच एसटी महामंडळाच्या या बसचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
एका हातात स्टिअरिंग तर दुसऱ्या हातात वायपर
नांदेड जिल्ह्यातील एका एसटी बसचाही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एसटी बसचा चालक एका हाताने स्टिअरिंग आणि दुसर्या हाताने काचेवरील वायपर फिरवत असल्याचे पाहायला मिळत आहे. भर पावसात बसचा वायपर बंद झाल्याने चालकावर ही वेळ आल्याचे बोलले जात आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूरच्या अशाच एका एसटी बसचा धोकादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एसटी बसेसचे वायपर काम करत नसल्याने ड्रायव्हर हाताने काच साफ करत एसटी चालवत आहे. अशा पद्धतीने धोकादायक एसटी चालवणाऱ्या ड्रायव्हरचा व्हिडीओ काढून एका प्रवाशाने सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे पुन्हा एकदा एसटी बसची दूरवस्था समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)