एक्स्प्लोर

Parbhani: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; अग्रीम पीकविमा मंजूर, शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास झाली सुरूवात

शेतकऱ्यांना 40 कोटींचा अग्रीम पीकविमा मंजूर झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे. अतिवृष्टीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

परभणी:  परभणी जिल्ह्यातील (Parbhani) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना 40 कोटींचा अग्रीम पीकविमा मंजूर झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे. अतिवृष्टीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी परभणी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील आठ मंडळात 73 हजार 814 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये अग्रीम विमा मंजूर करण्यात आला होता. ऑगस्ट महिन्यात परभणी जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात 26 दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी 6 सप्टेंबरला शासकीय अधिकारी व विमा कंपनीचे प्रतिनिधींना सोयाबीनच्या नुकसानीसंदर्भात संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या मंडळातील मागील 7 वर्षातील सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत यंदा सरासरी उत्पादनात 50 टक्क्यापेक्षा अधिक घट झाली असल्याचे आढळून आले होते त्यानुसार icici लोंबर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने यासाठीची मंजूर रक्कम आता शेतकऱ्यांचा खात्यात जमा करण्यास सुरू केली आहे. सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.  

या मंडळात असे मिळत आहेत पैसे

  • गंगाखेड तालुक्यातील माखणी मंडळातील 13,626 शेतकऱ्यांना 6697 प्रति हेक्टरीप्रमाणे 5.26 कोटी
  • जिंतूर तालुक्यातील  दुधगाव मंडळातील 9,184 शेतकऱ्यांना 6,421 प्रमाणे 5.16 कोटी
  • मानवत तालुक्यातील रामपुरी मंडळातील 6,063 शेतकऱ्यांना 6248 प्रति हेक्टरीप्रमाणे 3.99 कोटी
  • परभणी तालुक्यातील जांब मंडळातील 10,953 शेतकऱ्यांना 6392 प्रतिहेक्टरी प्रमाणे 6.40 कोटी
  • परभणी तालुक्यातील सिंगणापूर मंडळातील 8,063 शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 6,363 प्रमाणे 4.80 कोटी
  • झरी मंडळातील 10,537 शेतकऱ्यांना 6,193 प्रतिहेक्टरी याप्रमाणे  6.01 कोटी
  • पुर्णा तालुक्यातील चुडावा मंडळातील 8,778 शेतकऱ्यांना 7,018 प्रतिहेक्टरीप्रमाणे 4.31 कोटी रुपये
  • सोनपेठ मंडळातील 6,005 शेतकऱ्यांना 6,763.85 प्रतिहेक्टरी प्रमाणे 4.16 कोटी 
  • एकूण 73 हजार 814 शेतकऱ्यांच्या खात्यावर 40.71 कोटी रुपये जमा होत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: अंबादास दानवे उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाच्या कालावधीत दोन दिवसांची कपात
मोठी बातमी: अंबादास दानवे उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाच्या कालावधीत दोन दिवसांची कपात
MLA Sunil Shinde: मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
Anant Amabni-Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार जस्टीन बीबर, मानधनाचा आकडा किती?
अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार जस्टीन बीबर, मानधनाचा आकडा किती?
काही काळजी नाही, बहिण विधानपरिषदेवर आली, भाऊपण येणार, महादेव जानकरांची नेमकी अपेक्षा काय?
काही काळजी नाही, बहिण विधानपरिषदेवर आली, भाऊपण येणार, महादेव जानकरांची नेमकी अपेक्षा काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...Ladaki Bahin Yojana Application : प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी महिलांच्या रांगा, सेतू कार्यालयात गर्दीTeam India Cake Cut : हॉटेलमध्ये जल्लोष,  खास केकचं टीम इंडियाकडून कटींगTOP 100 Headlines : 2 July 2024: 6 AM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: अंबादास दानवे उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाच्या कालावधीत दोन दिवसांची कपात
मोठी बातमी: अंबादास दानवे उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाच्या कालावधीत दोन दिवसांची कपात
MLA Sunil Shinde: मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
Anant Amabni-Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार जस्टीन बीबर, मानधनाचा आकडा किती?
अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार जस्टीन बीबर, मानधनाचा आकडा किती?
काही काळजी नाही, बहिण विधानपरिषदेवर आली, भाऊपण येणार, महादेव जानकरांची नेमकी अपेक्षा काय?
काही काळजी नाही, बहिण विधानपरिषदेवर आली, भाऊपण येणार, महादेव जानकरांची नेमकी अपेक्षा काय?
Maharaj Movie Netflix : वादात अडकला, बहिष्काराचे आवाहन, तरीही आमिरच्या लेकाच्या 'महाराज'चा चित्रपटाचा डंका
वादात अडकला, बहिष्काराचे आवाहन, तरीही आमिरच्या लेकाच्या 'महाराज'चा चित्रपटाचा डंका
Sassoon Hospital : 'ससून'मध्ये वजन कमी करण्याची सर्जरी करुन घ्या, देशमुखांचा सल्ला, मुश्रीफ हसत हसत म्हणाले, सर्जरी पेक्षा व्यायाम करतो
'ससून'मध्ये वजन कमी करण्याची सर्जरी करुन घ्या, देशमुखांचा सल्ला, मुश्रीफ हसत हसत म्हणाले, सर्जरी पेक्षा व्यायाम करतो
रोहित शर्मा  ते सूर्यकुमार यादव, टीम इंडियाचे चार खेळाडू थेट विधानभवनात, मुख्यमंत्र्यांची भेट, भव्य सत्कार सोहळा!
रोहित शर्मा ते सूर्यकुमार यादव, टीम इंडियाचे चार खेळाडू थेट विधानभवनात, मुख्यमंत्र्यांची भेट
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
Embed widget