एक्स्प्लोर

परभणीतील महिलांचे फोटो मॉर्फ प्रकरण विधानसभेत; फडणवीसांनी केली पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाची घोषणा

Maharashtra Assembly Winter Session: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबधित एपीआयचे निलंबन केले असून, पोलीस निरीक्षकाची तत्काळ बदली करण्याची घोषणा केली आहे. 

Maharashtra Assembly Winter Session: भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा मॉर्फ केलेल्या फोटोचे पडसाद विधानसभेत उमटले असतानाच, परभणीतील महिलांचे फोटो मॉर्फ करत व्हायरल करण्यात आल्याप्रकरणी भाजप आमदार मेघना बोर्डीकरांनी (Meghana Bordikar) हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला.

सोशल माध्यमांमधील महिलांचे फोटो जमा करून त्यांना मॉर्फ करत परदेशी नंबरवरून ते वाईट पद्धतीने शेअर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार परभणी जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल होऊन देखील पोलिसांकडून तपासात उदासीनता पाहायला मिळाल्याने, असे प्रकार सुरूच होते. त्यामुळे भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी हिवाळी अधिवेशनात आज हा मुद्दा मांडत प्रश्न लावून धरला. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबधित एपीआयचे निलंबन केले असून, पोलीस निरीक्षकाची तत्काळ बदली करण्याची घोषणा केली आहे. 

मॉर्फ केलेले फोटो व्हाट्सअ‍ॅपवर

परभणीच्या जिंतूरमध्ये मागच्या काही दिवसांपासून महिलांचे फोटो सोशल माध्यमांमधून जमा करून त्याला अश्लीलतेची जोड देत ते पुन्हा सोशल माध्यमांमध्ये व्हायरल करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. +48 या आंतरराष्ट्रीय कोड नंबरवरून अशा प्रकाराने मॉर्फ केलेले फोटो व्हाट्सअ‍ॅपवर पाठवले जात होते. दरम्यान जिंतूर तहसील कार्यालयातील काही महिला कर्मचाऱ्यांचे फोटो बदनामीच्या हेतूने फोटोमॉर्फ करून समाज माध्यमावर व्हायरल करण्यात येत होते. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांचा पतीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात पोलीस निरीक्षकाने तपास करण्यास उदासीनता दाखवली होती. त्यामुळे असे प्रकार सुरूच होते. अखेर याबाबत आमदार मेघना बोर्डीकर यांनी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. 

अन्  अखेर पोलिसात गुन्हा दाखल झाला...

मागील काही दिवसांपूर्वी जिंतुर तहसील कार्यालयातील महिलांचे मार्फ केलेले फोटो व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. परंतु त्या महिला कर्मचाऱ्यांनी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे धाडस केले नाही. परिणामी गुन्हेगाराचे मनोबल वाढत गेले. त्यामुळे आरोपीने आणखी काही तहसील कार्यालयातील महिलांचे मॉर्फ फोटो शहरातील महिलांच्या मोबाईलवर व्हायरल केले. या घटनेने शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटना वाढत असल्याने अखेर पीडीत महिलांच्या पतीच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांकडून तपासात उदासीनता

गुन्हा दाखल झाला होऊनही पोलीस निरीक्षकाने घटनेची गंभीरपणे दखल घेतली नाही. त्यामुळे आरोपीचे कारनामे काही थांबायला तयार नव्हते. त्यामुळे अखेर आमदार मेघना बोर्डीकरांनी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. ज्यात जिंतुर पोलीस ठाण्याचे एपीआय यांचे निलंबन केले असून, पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर एकंदरीत घटनेचे गांभीर्य पाहता अधिकाऱ्याचे व कर्मचाऱ्यांचे निलंबन करून काहीही होणार नसून, आरोपीचा तत्काळ छडा लावून गजाआड करावे अशी भावना शहरातील महिलांनी व्यक्त केली आहे.

Maharashtra Assembly Winter Session: भुजबळ यांचा फोटो मॉर्फ करणार्‍या भाजप आमदार अतुल भातखळकरांवर कारवाई करा; जयंत पाटील यांची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भटक्या कुत्र्यांचा हौदास; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हौदास; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wadettiwar On Pune Drugs : कोणालाही कायद्याचा धाक राहिलेला नाही, विजय वडेट्टीवार सभागृहात आक्रमकSambhuraj Desai on Vidhan Sabha : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणाVijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भटक्या कुत्र्यांचा हौदास; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हौदास; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला
''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Embed widget