एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mahadev Jankar Property : स्वतःला फकीर म्हणणारे महादेव जानकर पाच कोटींचे मालक, अनेक जिल्ह्यात शेतजमीनी

Mahadev Jankar Property : जानकारांनी उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकारांना फकीराची उपमा दिली होती.

Mahadev Jankar Property : राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून (Parbhani Lok Sabha Constituency) महायुतीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, आपण फकीर माणूस असून, लग्न झालं नाही, मला घर-दार देखील नाही. मी रेल्वे स्टेशनवर सुद्धा झोपू शकतो असे वक्तव्य जानकर यांनी केले आहे. मात्र, स्वतःला फकीर म्हणून घेणाऱ्या महादेव जानकर यांची संपत्ती (Property) किती?, हे पाहून त्यांच्या गरीबीचा तुम्हाला अंदाज येईल. स्वतःला फकीर म्हणणारे महादेव जानकर हे पाच कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रांमधून ही माहिती समोर आली आहे.

जानकारांनी उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकारांना फकीराची उपमा दिली होती. महादेव जानकर यांना कुठेच घरदार नाही, ते रेल्वे स्टेशनवरही झोपू शकतात असे ते म्हणाले होते. पण प्रत्यक्षात जानकारांकडे कोट्यावधी रुपयाची संपत्ती असल्याचे त्यांच्या शपथपत्रातून समोर आले आहे.

जवळपास पाच कोटी रुपयांची संपत्ती...

महादेव जानकर मूळचे सातारा जिल्ह्यातील पळसवाडी येथील रहिवासी असून, त्यांनी सांगलीच्या वालचंद कॉलेज येथून डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली आहे. जानकर यांनी शपथपत्रात आपला व्यवसाय शेती हा दर्शविला आहे. जानकारांच्या नावावर अठरा एकर 14 गुंठे एवढी शेती असून, त्यांच्याकडे चल आणि अचल दोन्ही मिळून जवळपास पाच कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे माहिती शपथपत्रात नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे स्वतःला फकीर म्हणणाऱ्या महादेव जानकर यांच्याकडे कोट्यावधी रुपयाची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. 

मागील वर्षे 40 लाखांचे उत्पन्न...

महादेव जानकर यांनी आपले निवडणूक अर्ज भरताना जे ऍफिडेविट दिले आहे, त्यामध्ये त्यांनी आपले उत्पन्न दर्शविले आहे. सन 2022-23 मध्ये त्यांचे उत्पन्न 40 लाख 19 हजार 990 एवढे आहे. तर 2021-22 मध्ये 31 लाख 38 हजार 40 रुपये, 2020-21 मध्ये 27 लाख 40 हजार 750 रुपये, तर 2019-20 मध्ये 31 लाख 77 हजार 942 रुपये आणि 2018-19 मध्ये 26 लाख 26 हजार 639 रुपये एवढे उत्पन्न दर्शविण्यात आले आहे.

अचलसंपत्ती 1 कोटी 25 लाखांची 

महादेव जानकर यांच्याकडे चलसंपत्ती एक कोटी 25 लाख दहा हजार 598 रुपये एवढी आहे. यामध्ये त्यांच्याकडे कॅश इन हॅन्ड 27 हजार 330 रुपये आहेत. तर, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 51 लाख 66 हजार 779 रुपयाची एफडीआर करण्यात आला आहे. त्याचबरोबर गोल्ड बॉंड स्कीममध्ये 791 ग्रॅम सोन्यात गुंतवणूक केली असून, त्याचे मूल्य 29 लाख 96 हजार 3008 रुपये एवढे आहे. जानकर यांनी पीपीएफ खात्यात 2019-20 साठी दीड लाख रुपये, तर मार्च 2024 मध्ये दोन लाख 25 हजार 845 रुपये आहेत. जानकरांकडे 200 ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने असून, त्याचे बाजारमूल्य 13 लाख 65 हजार एवढे आहे. सर्व अचलसंपत्ती एक कोटी 25 लाख 10 हजार 598 रुपये एवढी आहे.

वेगवेगळ्या जिल्ह्यात जमिनी...

त्याचप्रमाणे महादेव जानकर यांच्याकडे अचल संपत्ती देखील तीन कोटी 62 लाख 99 हजार 760 रुपये एवढ्या किमतीची असल्याचे त्यांनी आपल्या घोषणा पत्रात सांगितले आहे. त्यामध्ये महादेव जानकर यांच्याकडे शेत जमीन, रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी आणि कमर्शियल प्रॉपर्टी याचा समावेश आहे. जाणकारांची शेतजमीन सातारा, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, बीड, सिंधुदुर्ग रायगड या ठिकाणी आहे. तर अ कृषिक जमीन हे सोलापूर, जालना या जिल्ह्यात आहेत. जाणकारांच्या कमर्शियल आणि रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी देखील आहेत. त्या रायगड, पुणे, अहमदनगर, मुंबई या ठिकाणी आहेत. जानकरांची चल आणि अचल संपत्ती मिळून जवळपास त्याचे बाजार मूल्य पाच कोटी रुपयांचे होत आहे.

गंभीर गुन्हा नाही, कर्ज देखील नाही...

महादेव जानकर यांच्यावर कसल्याही प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल नाहीत. त्यांच्यावर केवळ एकच गुन्हा दाखल आहे. तोही शासकीय अधिकाऱ्यांनी भाषण केल्याबद्दल केलेला आहे. त्यामुळे जानकर यांचे चारित्र्य शुद्ध असून, त्यांच्यावर कसल्याही प्रकारचे गंभीर गुन्हा दाखल नाही. जसे त्यांच्यावर गंभीर गुणी नाही, त्याचप्रमाणे जानकरांवर कसल्याही प्रकारचे कर्ज नसल्याचे या शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. महादेव जानकर यांना महाराष्ट्र शासनाकडून मुक्तगिरी बंगला मलबार हिल येथे तर आकाशवाणी आमदार निवासमध्ये एक रूम देखील देण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

महादेव जानकर खोपट्यात झोपू शकतात, तिथंच भाकरी खाऊन सकाळी कामाला लागू शकतात, अजित पवारांचं परभणीतलं भाषण चर्चेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना भवनात शुकशुकाट, सागर बंगल्यावर आनंदाला भरती
विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना भवनात शुकशुकाट, सागर बंगल्यावर आनंदाला भरती
Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं,  प्रविण दरेकर यांचं महायुतीच्या बाजूनं कल येताच मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रविण दरेकर यांचं मोठं वक्तव्य
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना भवनात शुकशुकाट, सागर बंगल्यावर आनंदाला भरती
विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना भवनात शुकशुकाट, सागर बंगल्यावर आनंदाला भरती
Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं,  प्रविण दरेकर यांचं महायुतीच्या बाजूनं कल येताच मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रविण दरेकर यांचं मोठं वक्तव्य
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Embed widget