27 एकरचं मैदान, 3 हेलिपॅड, मोदींच्या सभेसाठी चोख बंदोबस्त, महादेव जानकरांसाठी महायुतीची तगडी फिल्डिंग!
परभणीत महायुतीने महादेव जानकर यांना तिकीट दिले आहे. महादेव जानकर यांचा विजय व्हावा यासाठी आता थेट मोदी परभणीत सभा घेणार आहेत.
![27 एकरचं मैदान, 3 हेलिपॅड, मोदींच्या सभेसाठी चोख बंदोबस्त, महादेव जानकरांसाठी महायुतीची तगडी फिल्डिंग! loksabha election 2024 pm narendra modi rally in parbhani for campaign of mahadev jankar candidate of mahayuti 27 एकरचं मैदान, 3 हेलिपॅड, मोदींच्या सभेसाठी चोख बंदोबस्त, महादेव जानकरांसाठी महायुतीची तगडी फिल्डिंग!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/19/543f36f57ef158f93a8f8c37ec4e7a7c1713523839423988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
परभणी : सध्या महाराष्ट्रात सगळीकडे लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) धूम आहे. आपापल्या उमेदवाराच्या विजयासाठी महायुती (Mahayuti) आणि महाविकास (Maha Vikas Aghadi)आघाडी यांच्यातील घटकपक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. महायुतीकडून तर उमेदवारांच्या विजयासाठी थेट केंद्रातील नेत्यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी बोलवलं जात आहे. परभणीत महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) उभे राहिले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) परभणीत (Parbhani) येत आहेत. 20 एप्रिल रोजी मोदी यांची परभणीत जाहीर सभा होणार आहे.
जानकरांना शरद पवार देणार होते तिकीट, पण...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 20 एप्रिल रोजी परभणीच्या दौऱ्यावर असणार आहेत. येथे ते महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. या सभेची जय्यत तयारी भाजप तसेच महायुतीकडून केली जात आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर जानकर यांना महाविकास आघाडीकडून तिकीट दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तशी सकारात्मकता राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार या पक्षाचे सर्वेसर्व शरद पवार यांनीदेखील त्याबाबत सकारात्मकता दाखवली होती. मात्र जानकर यांना ऐनवेळी महायुतीने परभणीतून कितीट दिले आहे. तिकीट मिळाल्यानंतर आता जानकर हे संपूर्ण परभणी जिल्ह्यात पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत.
मोदींच्या सभेसाठी नेमकी तयारी काय?
मोदी यांच्या सभेसाठी महायुतीने जय्यत तयारी केली आहे. परभणी शहरातील पाथरी रस्त्यावरील लक्ष्मी नगरी या परिसरात 27 एकर परिसरात मोदी यांची ही सभा होणार आहे. मोदी यांना सभास्थळी उतरण्यासाठी तीन हेलिपॅडची उभारण्यात आले आहेत. तसेच या सभेत एक ते दीड लाख लोक बसतील एवढी आसन क्षमता उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या सभास्थळी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली जात आहे.
जानकरांनी मोदींच्या सभेबाबत दिली होती माहिती
एकंदरीतच अनेक वर्षानंतर पंतप्रधानपदी असलेली व्यक्ती परभणीत प्रचारासाठी येत असल्याने, ही सभा यशस्वी करण्यासाठी महायुतीडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जातोय. मोदी यांच्या या सभेबाबत जानकर यांनी काही दिवसांपूर्वी सूतोवाच केले होते. माझ्या प्रचारासाठी थेट मोदी परभणीत सभा घेणार आहेत, असे जानकर यांनी जाहीर सभेत सांगितले होते.
वंचितनेही दिला उमेदवार, कोणाचा विजय होणार?
दरम्यान, जानकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीने संजय जाधव यांना तिकीट दिले आहे. जाधव हे परभणीचे विद्यमान खासदार आहेत. येथे जानकर विरुद्ध जाधव अशी लढत होत आहे. त्यामुळे या जागेवर कोण बाजी मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)