एक्स्प्लोर

ISO Certified Graveyard : परभणीतील झरी गावातील स्मशानभूमीला आयएसओ मानांकन

ISO Certified Graveyard : माणसाचा शेवट अगदी स्वच्छ आणि सुंदर परिसरात करणारी एक वेगळी स्मशानभूमी परभणीत आहे. महत्त्वाचे म्हणजे या स्मशानभूमीला इथल्या सुविधांमुळे आयएसओ मानांकन मिळालं आहे.

ISO Certified Graveyard : स्मशानभूमी (Graveyard) म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहते ते सर्वत्र झाडंझुडपं वाढेलली, मृतावरील अंत्यसंस्कार करण्यासाठी उभारलेली दोन पात्र्याची शेड, ना बसायला जागा ना उभं राहावं वाटावं अशी भीतीदायक परिस्थिती. मात्र माणसाचा शेवट अगदी स्वच्छ आणि सुंदर परिसरात करणारी एक वेगळी स्मशानभूमी परभणीत (Parbhani)आहे. महत्त्वाचे म्हणजे या स्मशानभूमीला इथल्या सुविधांमुळे आयएसओ मानांकन (ISO Certification) मिळालं आहे. आयएसओ मानांकन मिळवणारी जिल्ह्यातील हि पहिली स्मशानभूमी ठरली आहे. 

परभणीपासून 18 किलोमीटर अंतरावर असलेलं झरी हे गाव. दुधना नदीच्या काठावर तब्बल 15 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं झरी हे गाव. गावातील प्रगतशील शेतकरी कृषिभूषण कांतराव देशमुख हे उपक्रमशील असतात. झरीचे 25 वर्ष ते सरपंच होते. त्यांच्या पत्नी गंगाबाई या 2002 साली जिल्हा परिषदेच्या सभापती असताना गावात एक चांगली स्मशानभूमी असावी हा विचार घेऊन कांतराव देशमुख यांनी काम सुरु केलं.

ISO Certified Graveyard : परभणीतील झरी गावातील स्मशानभूमीला आयएसओ मानांकन

झरीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दुधना नदीकाठी त्यांनी स्मशानभूमी उभारण्याचं काम सुरु केलं. एका एकरमध्ये त्यांनी तिथे स्मशानभूमी उभारुन संरक्षण भिंत बांधली. एकाच वेळी तीन जणांवर अंत्यसंस्कार करता येतील एवढं मोठं शेड बांधलं. याच स्मशानभूमीला त्यांनी त्यांच्या 'मातोश्री इंदिराबाई देशमुख वैकुंठधाम' असं नाव दिलं. देशमुख यांनी सातत्याने मागील 10 ते 15 वर्षात या स्मशानभूमीचा कायापालट केला. स्मशानभूमी परिसरात रंगरंगोटी, अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी सिमेंटचे बेंच, जागोजागी वड, पिंपळ, कडुनिंब, आंबा, चिंच, आवळा आदी वृक्ष मोठ्या प्रमाणावर लावून त्याचं 'ऑक्सिजन पार्क' असं नामकरण केलं आहे. याच परिसरात एक बोअर घेऊन त्याला हातपंपही त्यांनी बसवलाय, ज्याचं पाणीही या झाडांना जातं. रात्रीच्या वेळी अंधार राहू नये यासाठी विद्युत पोल उभारुन रोषणाई देखील केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी गावासाठी एक मोफत अंत्यविधी रथही सुरु केला आहे. 

झरीतील याच 'मातोश्री इंदिराबाई देशमुख वैकुंठधाम' स्मशानभूमीत कांतराव देशमुख यांनी उभारलेल्या सर्व भौतिक सुविधा आणि इतर बाबींच्या आधारे उभारलेल्या या स्मशानभूमीला नुकतंच आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे. आयएसओ मानांकन मिळवणारी परभणी जिल्ह्यातील पहिली स्मशानभूमी म्हणून झरीला बहुमान मिळाला आहे.  

ISO Certified Graveyard : परभणीतील झरी गावातील स्मशानभूमीला आयएसओ मानांकन

'एक गाव एक स्मशानभूमी' सारखा आदर्श उपक्रम 
कांतराव देशमुख यांनी झरीतील स्मशानभूमीचा तर कायापालट केलाच शिवाय त्यांनी जिल्ह्यात 'एक गाव एक स्मशानभूमी' ही संकल्पना राबवली, ज्यात 80 पेक्षा जास्त गावांनी सहभाग घेतला असून झरीप्रमाणेच या स्मशानभूमी येणाऱ्या काळात सुंदर आणि प्रशस्त होण्याकडे वाटचाल करत आहेत. 

इतर गावांनी पुढाकार घ्यावा, मी मदतीस तयार : कांतराव देशमुख 
गावागावातील स्मशानभूमी अडगळीत पडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांनी झरीप्रमाणेच एक आदर्श स्मशानभूमी उभारण्यासाठी पुढाकार घेऊन गावातील स्मशानभूमी सुंदर, स्वच्छ, प्रशस्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्यांना काही मदत लागेल ती करण्यासाठी मी सदैव तयार आहे, अशी प्रतिक्रिया कांतराव देशमुख यांनी यावेळी दिली.  

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Embed widget