Parbhani Violence Case : परभणी हिंसाचार प्रकरणात महत्त्वाची अपडेट, 3 पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश
Parbhani : परभणीत संविधान विटंबना झाली यानंतर जो काय प्रकार घडला, हे प्रकार घडत असताना पोलीस प्रशासनाने जी दक्षता घ्यायला पाहिजे होती ती घेण्यात आली नसल्याची कबुली एड धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे.
Parbhani Violence Case परभणी : परभणीत संविधान विटंबना झाली यानंतर जो काय प्रकार घडला, हे प्रकार घडत असताना पोलीस प्रशासनाने जी दक्षता घ्यायला पाहिजे होती ती घेण्यात आली नसल्याची कबुली राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष एड धर्मपाल मेश्राम यांनी परभणीत दिली आहे. तसेच या प्रकरणामधील जनतेचा रोष असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना ही विना FIR मदत
एड. धर्मपाल मेश्राम हे आज परभणी दौऱ्यावर होते. त्यांनी संविधान विटंबना घटनास्थळी भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनाही भेट दिली. यानंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन सर्व परिस्थीचा आढावा घेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पोलिसांवर जोरदार निशाणा साधलाय.
पोलिसांनी ज्या पद्धतीने या प्रकरणात काळजी घ्यायला होती, ती घेण्यात आली नाही. तसेच ज्या तीन पोलीस अधिकाऱ्यांवर सामान्य जनतेचा रोष आहे त्यांनाही तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना ही विना FIR मदत देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
परभणीमधील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याचा प्रकार काही दिवसांपुर्वी समोर आला होता. त्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. शहरातील काही दुकाने आणि वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. संतप्त जमावाने एसटी बसवरही दगडफेक केली होती. दरम्यान या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर आता परभणीतील या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत.
सरकारने भूमिका मांडावी : नाना पटोले
नाना पटोले म्हणाले की, परभणी आणि बीडमध्ये झालेल्या घटना या सरकार अस्तित्वात आल्यानंतर घडल्या आहेत. काल परभणीमध्ये आंबेडकरी विचारांची चळवळ लढणारा कार्यकर्ता मृत्युमुखी पडला, असे त्यांनी म्हटले. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात सदन प्रस्ताव आणि सूचना माझ्याकडे आलेल्या आहेत. त्या संदर्भातला निर्णय मी देईल. मी निर्णय दिल्यानंतर आपण यावर बोलू, असे म्हटले. यानंतर नाना पटोले म्हणाले की, सरकार अस्तित्वात आल्यानंतर या घटना घडलेल्या आहेत. आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेमुळे पूर्ण राज्यात हाहाकार माजला आहे.
विधानसभा अध्यक्ष आपल्या माध्यमातूनच आम्हाला न्याय मिळू शकतो. राज्यातील जनतेला न्याय मिळू शकतो. सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे राज्यात लोकांमध्ये तीव्र चिड निर्माण झाली आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करत आहे सरकारने त्यांची भूमिका मांडावी, असे त्यांनी यावेळी म्हटले.
हे ही वाचा