Parbhani News : लहान मुलाच्या खेळण्यावरून सुरू झालेला किरकोळ वाद विकोपाला; परभणीतील दोन गटात जोरदार राडा अन् दगडफेक
Parbhani News : लहान मुलांच्या खेळण्यावरून सुरू झालेल्या किरकोळ वादावादीतून दोन गटात जोरदार राडा झाल्याचा प्रकार परभणीच्या लहुजी नगर आणि एकबालनगरमध्ये झालाय. यात मारामारीनंतर दगडफेकही झाली आहे.

Parbhani News : लहान मुलांच्या खेळण्यावरून सुरू झालेल्या किरकोळ वादावादीतून दोन गटात जोरदार राडा झाल्याचा प्रकार परभणीच्या लहुजी नगर आणि एकबालनगरमध्ये झालाय. यात दोन्ही गटाकडून झालेल्या मारामारीनंतर (Parbhani Crime News) दगडफेकही झाली आहे. त्यामुळे दोन्ही नगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर मोठ्या प्रमाणावर पोलीस कुमक घटनास्थळी पोहोचली असून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, तहसीलदार विकास राजगुरू यांच्यासह अधिकाऱ्यांचा ताफा (Crime News)घटनस्थळी पोचला असून काल (19 एप्रिल) मध्यरात्रीपर्यंत परीसारत तनावपूर्ण शांतता प्रस्थापित करण्यात आलीय. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र कुणीही कायदा हातात घेवू नये, अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी दिला आहे.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे टोकाचे पाऊल, विष प्राशन करून स्वत:ला संपवलं
अकोल्यात एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने अर्थातच ASI नं आत्महत्या केलीय. जगदीश शिंदे असं आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. शिंदे हे अकोला पोलीस मुख्यालयात कार्यालयात होते. आपल्या मूळगावी म्हैसपूर गावात त्यांनी विष प्राशन केल होत. त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होता. मात्र,उपचारा दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जगदीश शिंदे यांचं आत्महत्याच मूळ अद्याप कारण समोर आलं नाहीये. परंतु एका पोलीस कर्मचाऱ्याला आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल का उचलावं लागलं.. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.. या प्रकरणात अकोल्याच्या कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास केला जातोये.
सातपिर दर्गा अतिक्रमण प्रकरण, दगडफेक केल्याप्रकरणी 39 जणांना न्यायालयीन कोठडी
दुसरीकडे नाशिक शहरातील सातपिर दर्गा अतिक्रमण प्रकरणात पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी 39 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस कोठडी संपल्यानंतर काल (19 एप्रिल) 37 जणांना कोर्टात हजर करण्यात आले होते. यापूर्वीचे 37 आणि काल हजर केलेले दोन असे 39 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी 39 जणांना पोलीस कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिक शहरातील काठी गल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या विरोधात जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीत 21 हुन अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले होते. अशातच या दंगेखोरांना न्यायालयाने ही दणका दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या






















