Pandharpur News: चिमुकला खेळतांना शेततळ्यात पडला, बचावासाठी वडीलांसह आईचे शर्तीचे प्रयत्न अपयशी; पंढरपूरच्या कोर्टी येथे संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी शेवट
Pandharpur News: पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे एका धक्कादायक प्रकाराने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. कोर्टी येथील एका शेतात लोंढे कुटुंबीय कामाला होत.

Pandharpur News: पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे एका धक्कादायक प्रकाराने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. कोर्टी येथील एका शेतात लोंढे कुटुंबीय कामाला होत. त्यांचा पाच वर्षाचा मुलगा खेळत खेळत शेतकऱ्याकडे गेला आणि पाण्यात पडला. त्याला वाचवायला आईने शेततळ्यात उडी घेतली आणि तीही त्यात बुडू लागली. हे पाहताच चिमूरड्याच्या वडिलांनीही शेततळ्यात उडी घेतली, मात्र बाहेर पडता येत नसल्यामुळे तिघांचाही या शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तिघांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढले. यामुळे पती-पत्नी आणि त्यांचा चिमुरडा या संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
या दुर्दैवी घटनेत विजय राजकुमार लोंढे (वय 30) प्रियांका विजय लोंढे (वय 28) प्रज्वल विजय लोंढे (वय 5) या तिघांचा मृत्यू झाला आहे. लोंढे कुटुंबीय मूळचे मंगळवेढा तालुक्यातील रहिवासी असून जगण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील एका शेतात सालगडी म्हणून राहत होते. दरम्यान हि दुर्दैवी घटना घडली आहे.
Navi Mumbai: नाकातील केस कापण्याच्या वादातून सलून चालकाला बेदम मारहाण
नाकातील केस कापण्याच्या एका किरकोळ कारणावरून सलून चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना कोपरखैरणे सेक्टर 4 ए मध्ये घडली आहे. आरोपी गणेश पार्टे हा इसम इतरत्र केस कापून सुजय पाटील यांच्या सलून मध्ये आला. आणि तेथील कर्मचाऱ्याला नाकातले केस कापण्यासाठी सांगितले. जिथे केस कापले तिथेच जाऊन नाकातील केस कापा, असं कारागिराने सांगताच आरोपी गणेश पार्टे याचा पारा चढला आणि कारागीर असू खान याला हाताचा पट्याने मारहाण केली. तसेच सलूनचे मालक सुजय पाटील यांना देखील ते घरी जात असताना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, आरोपी गणेश पार्टे विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळू माफियांना आयपीएस प्रशांत डांगळे यांचा पुन्हा दणका, चंद्रभागा उध्वस्त करणाऱ्या माफियांवर धाड सत्र सुरूच
संपूर्ण विठ्ठल भक्तांचे आराध्य असणाऱ्या चंद्रभागेच्या पात्रात अवैध रीतीने वाळूचे उत्खनन करणाऱ्या माफी यांना उपविभागीय अधिकारी प्रशांत डांगळे यांनी पुन्हा दणका दिला असून जवळपास 70 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पंढरपूर शहराला चिटकून असणाऱ्या इस बाबी आणि नदीकाठच्या चिंचोली भोसे गुरसाळे वगैरे गावात पोलिसांनी छापे टाकून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्याच आठवड्यात आयपीएस प्रशांत डांगळे यांनी तब्बल सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त करत वाळू माफियांना दणका दिला होता. ही कारवाई अशीच सुरू ठेवत डांगळे यांनी नदी पात्रात अवैध वाळू काढणारे जेसीबी टिप्पर तर जप्त केलेच याशिवाय वाळू उपसा साठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी होड्याही कटरने कापून टाकले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























