ठाणे-घोडबंदर महामार्गावर खड्ड्यांमुळं वाहतूक कोंडी; ॲम्ब्युलन्स अडकल्याने महिलेचा मृत्यू
ठाणे-घोडबंदर महामार्गावर सुरु असलेल्या खड्डे दुरुस्तीमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीने आणखी एक बळी घेतला आहे.
पालघर : ठाणे-घोडबंदर महामार्गावर (Thane-Ghodbunder highway) सुरु असलेल्या खड्डे दुरुस्तीमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीने आणखी एक बळी घेतला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरार-वसई ते घोडबंदरपर्यंत प्रचंड कोंडी झाल्याने ॲम्ब्युलन्स (ambulance) अडकली आणि पालघर तालुक्यातील सफाळे (मधुकर नगर) येथील छाया कौशिक पुरव (गुरव) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अचानक झाड कोसळल्याने छाया पुरव गंभीर जखणी झाल्या होत्या
छाया पुरव या मूळ सफाळे येथील असून मुंबईतील माहीम कोळीवाडा येथे वास्तव्यास होत्या. 30 जुलै रोजी सुट्टीसाठी मूळ गावी आल्या असताना जिल्हा परिषद शाळा व घराजवळ झाडांच्या फांद्या कापण्याचे काम सुरू होते. अचानक झाड कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या. सुरुवातीला त्यांना पालघर येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर होत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला.
ॲम्ब्युलन्स वेळेत पोहोचली असती, तर त्यांचे प्राण वाचले असते
दरम्यान, मुंबईकडे जाताना घोडबंदर महामार्गावरील दुरुस्ती कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. त्यामुळे ॲम्ब्युलन्सला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. स्थिती बिघडत चालल्याने त्यांना तातडीने मिरा रोड येथील ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी छाया पुरव यांना मृत घोषित केले. कुटुंबीयांचा आरोप आहे की, जर ॲम्ब्युलन्स वेळेत पोहोचली असती, तर त्यांचे प्राण वाचले असते. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप असून महामार्गावरील दुरुस्ती व वाहतूक व्यवस्थापनावरील प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहे
नेममं काय आहे प्रकरण?
विक्रोळी येथील पालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. निखिल चोरगे असं या मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. यामुळं सध्या त्याच्या कुटुंबाने रुग्णालयातील त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळं सध्या रुग्णालयाबाहेर लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच लोकांकडून या घटनेंसदर्नभात संताप व्यक्त केला जात आहे. निखिलला ताप आला होता, मात्र रुग्णालयातील औषधे घेतल्यावर त्याला उलट्या झाल्या आणि त्याला परत रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यामुळे नागरिक संतप्त झाले असून कारवाईची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:

























