एक्स्प्लोर

Raigad: भटक्या जमाती विरोधातही नोंदवला जाऊ शकतो अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा; राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

Raigad: भटक्या जमाती विरोधातही अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो, रायगडमधील एका प्रकरणात राज्य सरकारने हायकोर्टात ही माहिती दिली आहे.

Raigad: भटक्या जमातीतील व्यक्तिविरोधातही अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अ‍ॅट्रोसिटी) गुन्हा नोंदवला जाऊ शकतो, अशी माहिती राज्य सरकारनं नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. भटक्या जमातीतील व्यक्तीविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा (Atrocity) गुन्हा नोंदवला जाऊ शकतो की नाही? याची माहिती समाज कल्याण विभागाकडून मागवण्यात आली होती. त्यावर भटक्या जमातीतील व्यक्तीविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो, असं समाज कल्याण विभागानं हायकोर्टात स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारतर्फे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाला ही माहिती देण्यात आली, त्याची नोंद करुन घेत न्यायालयानं यासंदर्भातील सुनावणी 11 ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

रायगड येथील रहिवासी चिन्मय खंडागळे विरोधात त्याच्याच पत्नीनं बलात्कार, फसवणूक आणि अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदवला आहे. या दोघांचा प्रेम विवाह झाला आहे आणि त्याची पत्नी अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे. रायगड येथील रसायनी पोलीस ठाण्यात नोंदवलेला हा गुन्हा रद्द करण्यासाठी खंडागळेने न्यायालयात याचिका केली आहे.

याचिकाकर्त्याचा दावा आहे की, आपण लोहार जातीचे आहोत. 9 मार्च 2006 रोजी राज्य शासनानं काढलेल्या अध्यादेशानुसार लोहार जात भटक्या जमातीत मोडते, त्यामुळे आपणच भटक्या जमातीतील असल्यानं इथं अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही. त्यावर हा मुद्दा महाराष्ट्रावर दुरोगामी परिणाम करणारा आहे. तेव्हा मागासवर्गीयाच्या तक्रारीनुसार भटक्या जमातीतील व्यक्तीविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदवू शकतो की नाही? याची माहिती राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते. त्यानुसार अतिरिक्त सरकारी वकील गिता मुळेकर यांनी वरील माहिती न्यायालयात दिली.

खोट्या अ‍ॅट्रोसिटी गुन्ह्यात अडकवून खंडणीची मागणी केल्याने तरुणाची आत्महत्या

खोट्या अ‍ॅट्रोसिटी गुन्ह्यात अडकवून खंडणीसाठी त्रास दिल्यानंतर, लग्नसुद्धा होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याने सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पोसेवाडीमधील तरुणाने 1 जुलै रोजी आत्महत्या केली. महेश जाधव या 25 वर्षीय तरुणाने शनिवारी दुपारी आपल्या घराजवळ असलेल्या जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेत गावचा सरंपच थेट आरोपी निघाला असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मात्र, खोट्या अ‍ॅट्रोसिटीत अडकवणारे अजूनही मोकाट असल्याने गावकरी संतप्त झाले असून ते रस्त्यावर उतरले. त्यांनी गावात मोर्चा काढत झालेल्या घटनेचा निषेध करत मोकाटांवर तातडीने कारवाईची मागणी केली. मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सरपंच अंकुश नामदेव ठोंबरे, उपसरपंच सागर जाधव, धर्मराज जाधव, दादासाहेब दुशारेकर, महेंद्र मोहिते आणि नितीन खुडे या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील सरपंच अंकुश ठोंबरेला पोलिसांनी अटक केली होती. 

हेही वाचा:

Sangli Crime: तुझ्याच आठवणीत जगत राहीन, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही; मोबाईल स्टेटस ठेवत तरुणाची वारणा नदीत उडी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
Anna hazare : आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं, आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंनाही सोडलं नाही, म्हणाले...
आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं, आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंनाही सोडलं नाही, म्हणाले...
बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
Champions Trophy :चॅम्पियन्स ट्रॉफीतील धोकादायक संघ कोणता? भारत, पाकिस्तान की.... रवी शास्त्रींनी कोणत्या संघाचं नाव घेतलं?
चॅम्पियन्स ट्रॉफीतील धोकादायक संघ कोणता? भारत, पाकिस्तान की.... रवी शास्त्रींनी कोणत्या संघाचं नाव घेतलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raigad DPDC Meeting Update : शिवसेना आमदारांशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक, महायुतीत धुसफूसSuresh Dhas PC : जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकण्याच कळतं का? धस यांचा हल्लाबोलGiriraj Sawant On Rushiraj Sawant : भावाचा बाहेर जातोय असा मेसेज,ऋषिराज सावंतांचे मोठे बंधू 'माझा'वरCotton storage Bag Scam : 'कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याची माहिती Dhananjay Munde यांना आधीच दिली होती'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
Anna hazare : आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं, आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंनाही सोडलं नाही, म्हणाले...
आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं, आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंनाही सोडलं नाही, म्हणाले...
बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
Champions Trophy :चॅम्पियन्स ट्रॉफीतील धोकादायक संघ कोणता? भारत, पाकिस्तान की.... रवी शास्त्रींनी कोणत्या संघाचं नाव घेतलं?
चॅम्पियन्स ट्रॉफीतील धोकादायक संघ कोणता? भारत, पाकिस्तान की.... रवी शास्त्रींनी कोणत्या संघाचं नाव घेतलं?
मुंबईतील वयोवृद्ध महिलेची निर्घुण हत्या, शेजारील 27 वर्षीय युवकाला अटक; पोलिसांनी 2 तासांत लावला छडा
मुंबईतील वयोवृद्ध महिलेची निर्घुण हत्या, शेजारील 27 वर्षीय युवकाला अटक; पोलिसांनी 2 तासांत लावला छडा
पंतप्रधानांच्या मेरी माटी मेरा देश उपक्रमाला राज्याच्या पंचायत विभागाकडून खो; कोट्यवधींची रक्कम थकीत
पंतप्रधानांच्या मेरी माटी मेरा देश उपक्रमाला राज्याच्या पंचायत विभागाकडून खो; कोट्यवधींची रक्कम थकीत
Chhagan Bhujbal : अहो भुजबळ! तुमच्याच पक्षाने तुम्हाला हिमालयात पाठवायची व्यवस्था केलेय; भाजपचा बोचरा पलटवार
अहो भुजबळ! तुमच्याच पक्षाने तुम्हाला हिमालयात पाठवायची व्यवस्था केलेय; भाजपचा बोचरा पलटवार
राहुल सोलापूरकर पुरावे द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षाचा सज्जड इशारा 
राहुल सोलापूरकर पुरावे द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षाचा सज्जड इशारा 
Embed widget