एक्स्प्लोर

Sangli Crime: तुझ्याच आठवणीत जगत राहीन, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही; मोबाईल स्टेटस ठेवत तरुणाची वारणा नदीत उडी

नदीत उडी मारण्यापूर्वी मोबाईलच्या स्टेटसला मला शोधण्याचा प्रयत्न करू नको, मी झोकून दिले, कुठेही सापडणार नाही. तुझ्याच आठवणीत जगत राहिन, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही, असा मजकूर ठेवला होता. 

Sangli Crime: सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील मांगले आणि सावर्डे बंधाऱ्यावरून तरुणाने मोबाईलला स्टेटस ठेवून नदीत उडी मारली आहे. ही घटना शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. तुषार गणपती पांढरबळे (वय 24) असे त्याचे नाव आहे. त्याच्या स्टेटसवरून त्याने नाजूक प्रकरणातून टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. वारणा नदीत शोध घेण्यासाठी आज (6 ऑगस्ट) सकाळी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले असून त्याचा शोध सुरू आहे.

मला शोधण्याचा प्रयत्न करू नको, मी झोकून दिले, कुठेही सापडणार नाही

तुषार हा मूळचा बिळाशीचा आहे. तो मांगलेमध्ये आजोळी आईसह रहात होता. तो मांगलेत खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. वारणा नदीत उडी मारण्यापूर्वी काही तास अगोदर त्याने मोबाईलच्या स्टेटसला मला शोधण्याचा प्रयत्न करू नको, मी झोकून दिले, कुठेही सापडणार नाही. तुझ्याच आठवणीत जगत राहिन, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही, असा मजकूर ठेवला होता. 

मासेमारी करणाऱ्या लोकांकडून अडवण्याचा प्रयत्न

काल (6 ऑगस्ट) दुपारी तो तीनच्या सुमारास मांगले सावर्डे बंधाऱ्याकडे तुषार गेला. त्याचे बंधाऱ्यावर बराच वेळ मोबाईलवर कोणाशी तरी बोलणे सुरू होते. त्यानंतर त्याने नदीत उडी मारली. त्याठिकाणी मासेमारी करणाऱ्या लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. तुषारने उडी मारल्यानंतर नदीच्या पाण्याच्या प्रवाहात तो दिसेनासा झाला. मांगल्याचे पोलीस पाटील संजय कांबळे यांनी घटनेची माहिती शिराळा पोलीस ठाण्यात दिली. शिराळा पोलीस घटनास्थळी आले. मात्र, वारणा नदीचे पात्र मोठे विस्तीर्ण आहे, त्यामुळे तुषारला शोधणे अवघड झाले आहे. बंधाऱ्याखाली पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने तो किती दूर गेला आहे, हे समजणे कठीण आहे.

मुलाचा कुऱ्हाडीने खून करून कटरने तुकडे करत तलावात फेकले

दरम्यान, दारुड्या मुलाला कंटाळून बापानेच कुऱ्हाडीने खून करून नंतर मृतदेहाचे कटरच्या सहाय्याने तुकडे केले आणि ते तलावात फेकल्याची घटना मिरजमध्ये दोन दिवसांपूर्वी घडली. राजेंद्र यल्लाप्पा हंडिफोड (वय 50, रा. गणेश तलाव लक्ष्मी मंदिर, मिरज) असे निर्दयी बापाचे नाव आहे. रोहित राजेंद्र हांडीफोड (वय 30) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. बापाने मिरज शहर पोलिसांत हजर होऊन खुनाची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांची पळापळ सुरू झाली.

सुभाष नगर, शिंदे हॉलजवळ राजेंद्र हंडीफोडचा मालकीचा प्लॉट आहे. या ठिकाणी राजेंद्रने मुलगा रोहितचा खून करून तुकडे करून पोत्यात भरले आणि काही शरीराचे तुकडे गणेश तलाव येथे आणून टाकले. रोहितला दारु आणि जुगाराच्या आहारी गेला होता. त्यामुळे व्यसनासाठी रोहित कुटुंबाला त्रास देत असल्याने बापाने कायमचा काटा काढण्यासाठी खून केला. या घटनेनंतर बापाच्या चेहऱ्यावर मात्र कोणत्याही प्रकारचा पश्चातापाचा लवलेश जाणवत नव्हता.

इतर महत्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani violence: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण : सुषमा अंधारेंनी तीन पोलिसांची नावं घेतली, म्हणाल्या, डिपार्टमेंटल चौकशी नकोच!
सुषमा अंधारेंनी सोमनाथ सूर्यवंशीचा फोटो दाखवला; पोलिसांवर गंभीर आरोप, अंगावर वार केल्याच्या खुणा
Gold Rate Today: सोने दरात घसरण, MCX वर देखील दर घसरले, जाणून घ्या आज काय घडलं? 
सोन्याच्या  दरातील तेजीला ब्रेक, दरात घसरण, फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे लक्ष
सत्तार, सावंत, केसरकरांच्या नाराजीवर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य; म्हणाले, त्यांनी मंत्रीपदं भोगली, आता...
सत्तार, सावंत, केसरकरांच्या नाराजीवर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य; म्हणाले, त्यांनी मंत्रीपदं भोगली, आता...
धक्कादायक! परभणीत धरपकडीत महिलेला पोलिसांकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
धक्कादायक! परभणीत धरपकडीत महिलेला पोलिसांकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deepak Kesarkar Nagpur : मला मंत्री करा असं कुणाला सांगितलेलं नाही - दीपक केसरकरShivendraRaje Bhosle Cabinet Minister : जबाबदारी वाढली, चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेलNitesh Rane Nagpur : हिरवा गुलाल उडवणाऱ्यांना आता हिरव्या मिरच्या लागताय - नितेश राणेTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM :16 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani violence: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण : सुषमा अंधारेंनी तीन पोलिसांची नावं घेतली, म्हणाल्या, डिपार्टमेंटल चौकशी नकोच!
सुषमा अंधारेंनी सोमनाथ सूर्यवंशीचा फोटो दाखवला; पोलिसांवर गंभीर आरोप, अंगावर वार केल्याच्या खुणा
Gold Rate Today: सोने दरात घसरण, MCX वर देखील दर घसरले, जाणून घ्या आज काय घडलं? 
सोन्याच्या  दरातील तेजीला ब्रेक, दरात घसरण, फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे लक्ष
सत्तार, सावंत, केसरकरांच्या नाराजीवर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य; म्हणाले, त्यांनी मंत्रीपदं भोगली, आता...
सत्तार, सावंत, केसरकरांच्या नाराजीवर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य; म्हणाले, त्यांनी मंत्रीपदं भोगली, आता...
धक्कादायक! परभणीत धरपकडीत महिलेला पोलिसांकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
धक्कादायक! परभणीत धरपकडीत महिलेला पोलिसांकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Weekly Horoscope 16 To 22 December 2024 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचं परभणी राड्यावर विधानसभेत भाष्य, म्हणाले, बाबासाहेबांना हे अपेक्षित नाही, विरोधकांनी राजकारण करू नये!
मुख्यमंत्र्यांचं परभणी राड्यावर विधानसभेत भाष्य, म्हणाले, बाबासाहेबांना हे अपेक्षित नाही, विरोधकांनी राजकारण करू नये!
सत्तार म्हणतायत अल्पसंख्यांक चेहरा हसन मुश्रीफ मंत्रिमंडळात, मुश्रीफ म्हणतात, छगन भुजबळांकडे जाऊन...
सत्तार म्हणतायत अल्पसंख्यांक चेहरा हसन मुश्रीफ मंत्रिमंडळात, मुश्रीफ म्हणतात, छगन भुजबळांकडे जाऊन...
Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकरांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, पण तो चांगलं भविष्य असणारा नेता: देवेंद्र फडणवीस
गोपीचंद पडळकरांना मारकडवाडीचं आंदोलन नडलं का? देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Embed widget