Palghar Crime News : पालघरमधील आश्रम शाळेत 10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा स्वच्छतागृहात जात जीवन संपवण्याचा प्रयत्न
Palghar Crime News : पालघरमधील (Palghar Crime) आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनींची सुरक्षा राम भरोसे असल्याचं पाहायला मिळत आहे. डहाणूच्या रानशेत येथील आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
Palghar Crime News : पालघरमधील (Palghar Crime) आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनींची सुरक्षा राम भरोसे असल्याचं पाहायला मिळत आहे. डहाणूच्या रानशेत येथील आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न विद्यार्थीनीने केलाय. दरम्यान, सहकारी विद्यार्थ्यांच्या प्रसंगावधानामुळे तिचा जीव बचावला आहे. गळफास लागल्याने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक आहे.
विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी सिलवासा येथे हलवलं
दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. कासा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी सिलवासा येथे हलवलं. दरम्यान, आत्महत्या करण्यामागे नेमकं काय कारण आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, आश्रम शाळेत शिकणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय.
'माझं तुझ्यावर प्रेम आहे, लांब फिरायला येशील का?' म्हणत शेजाऱ्याकडून विनयभंग, तरुणीने हाताची नस कापली
एक दिवस आधी रायगडमधील एका तरुणीनेही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. महाड एमआयडीसी परिसरातील एका तरुणीने हाताची नस कापून घेतल्याने खळबळ उडाली होती. तरुणीने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान, सध्या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.
लांब फिरायला येशिल का ? असे बोलून शेजाऱ्याने तरुणीचा विनयभंग
माझे तुझ्यावर प्रेम आहे, लांब फिरायला येशिल का ? असे बोलून शेजाऱ्याने तरुणीचा विनयभंग केला. त्यानंतर तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपींविरोधात तक्रार दाखल दाखल करण्यात आली आहे. संदिप चव्हाण, रोहिदास चव्हाण अशी आरोपींची नावे समोर आली आहेत. महाड MIDC पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पत्नी अन् 2 मुलांसमवेत विष खाल्लं, उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू