एक्स्प्लोर

विरोधी आमदार माझ्या मुलासारखे, त्यांच्या पक्षात पोस्टर बॉयज, पण मनापासून माझं काम करतायत; हितेंद्र ठाकूरांचा गौप्यस्फोट

Palghar Lok Sabha Election 2024 : विरोधी आमदार माझ्या मुलासारखे, त्यांच्या पक्षात पोस्टर बॉयज, पण मनापासून माझं काम करतायत, असा गौप्यस्फोट हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

पालघर : पालघर लोकसभेच्या निवडणूक रणसंग्रामास आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. पालघरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. बहुजन विकास आघाडीने (Bahujan Vikas Aghadi) ही प्रचारास सुरुवात केली आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी मतदारसंगात चौक सभा घेण्यावर भर दिला आहे. नुकतंच आजारपणातून बरे झालेले हितेंद्र ठाकूर आता मतदारसंघात चौकाचौकात नागरीकांशी संवाद साधताना दिसत आहेत. त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेत आहे. सईच्या तुंगारफाटा येथील शनी मंदिराच्या प्रागंणात चौक सभा पार पडली.

विरोधी आमदार माझ्या मुलासारखे : हितेंद्र ठाकूर

विरोधी आमदार माझ्या मुलासारखे आहेत, ते नाईलाजस्तव आपल्या पक्षात काम करतायत, ते तेथे पोष्टर बॉईज आहेत, ते मनापासून माझे काम करतायत, असा गौप्यस्फोट हितेंद्र ठाकूरांनी मोठा केला आहे. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी संवाद साधला आहे. यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी हे वक्तव्य केलं आहे. आपल्या उमेदवाराकरता फिरतोय. भाषणं ठोकून पळणं मला जमतं नाही. मी नागरीकांशी संवाद साधतो, थेट बोलतो, त्यांचे प्रश्न ऐकतो, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

विरोधी आमदार पक्षात पोस्टर बॉयज, पण मनापासून माझं काम करतात

पालघरमध्ये एक कम्युनिष्ट पक्षाचा आमदार तर दुसरा राष्ट्रवादीचा आमदार आहे, दोन्ही मला मुलासारखे आणि दोन्ही आमचे उमेदवार राजेश पाटील यांचे मित्र आहेत. ते नाईलाजस्तव काम करतायत. त्यांच्या पक्षात फक्त ते पोष्टर बॉय आहेत. ते मनापासून माझे काम करतायत, असा गौप्यस्फोट डहाणू विधानसभेचे कम्युनिष्ठ पक्षाचे आमदार आणि विक्रमगडचे राष्ट्रवादीचे आमदार यांच्याबद्दल हितेंद्र ठाकूरांनी केला आहे. 

भुलथापांना बळी पडल्याने बळीराम जाधव पडले

पाण्याचा प्रश्न सुटलाय. पाईपलाईन टाकण्याचं काम सुरु आहे. पालघरसाठीचे मोठे प्रकल्प जे केंद्रातून होत असतात, आपले माजी खासदार बळीराम जाधव यांनी केंद्रातून विविध योजनेतून पालघरसाठी साडेतीन हजार कोटी एवढा निधी आणला. दुर्दैवाने मागील 10 वर्षात एका लाटेत किंवा भुलथापांना बळी पडून आपले खासदार पडले किंवा पाडले गेले. आता लोकांना माहित पडले आहे, आता लाट राहिली नाही. पाईप गॅस आणण्याचं काम आमच्या खासदारांनी केलं आहे. विद्यमान खासदारांनी पालघरसाठी काही केलं नाही, असं म्हणत हितेंद्र ठाकूर यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

मी भाजपा विरोधात लढतोय, ठाकरे गटाचं आव्हान नाही

दोन तगडे पक्ष आपापसात लढतायत. पालघरमध्ये आम्ही एक नंबरला आहे. पालघर लोकसभेत आमचे तीन आमदार, जिल्हा परिषद सभापती, वसई विरार पालिकेत 115 पैकी 109 नगरसेवक, असंख्य ग्रामपंचायत सदस्य आहेत. माझा प्रमुख विरोधक भाजपा आहे. मी भाजपा विरोधात लढतोय, शिवसेना ठाकरे गटाचं आव्हान मला नाही. त्यांच्याकडे आहे तरी काय? तसेच भाजपाकडे तरी आहे काय? असं म्हणत त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपावर हल्ला चढवला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime News: ट्रेनमध्ये धक्का लागताच हिंदी-मराठी बोलण्यावरुन वाद; 4-5 जणांकडून मारहाण, कल्याणमधील अर्णव खैरेने घरी येऊन जीवन संपवलं!
ट्रेनमध्ये धक्का लागताच हिंदी-मराठी बोलण्यावरुन वाद; 4-5 जणांकडून मारहाण, कल्याणमधील अर्णव खैरेने घरी येऊन जीवन संपवलं!
सांगलीच्या शौर्य पाटीलचा दिल्लीत आयुष्याचा शेवट; प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळत टोकाचं पाऊल
सांगलीच्या शौर्य पाटीलचा दिल्लीत आयुष्याचा शेवट; प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळत टोकाचं पाऊल
Kagal Nagar Palika Election: कागल नगरपालिकेत भलतीच रंगत, एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता पालकमंत्र्यांची रसद; घेतला तगडा निर्णय, मुश्रीफ विरुद्ध आबिटकर सामना पुन्हा रंगणार
कागल नगरपालिकेत भलतीच रंगत, एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता पालकमंत्र्यांची रसद; घेतला तगडा निर्णय, मुश्रीफ विरुद्ध आबिटकर सामना पुन्हा रंगणार
Maharashtra Temperature Today: दक्षिणेत पाऊस उत्तरेत बर्फ, महाराष्ट्रात हवामान पुन्हा बदलणार! पुण्यासह कुठे किती पारा?
दक्षिणेत पाऊस उत्तरेत बर्फ, महाराष्ट्रात हवामान पुन्हा बदलणार! पुण्यासह कुठे किती पारा?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ
Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता
Kagal Alliance : जुने वैरी, नवी यारी! घाटगे विरुद्ध मुश्रीफ संघर्षाचा इतिहास Special Report
Jaykumar Gore Solapur :पालिका निवडणुकांनंतर उरलेलेही भाजपात येण्यासाठी धडपडतील, गोरेंची टोलेबाजी
Balraje Patil On Ajit Pawar : चॅलेंज देणाऱ्यांना दादा माफ करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Crime News: ट्रेनमध्ये धक्का लागताच हिंदी-मराठी बोलण्यावरुन वाद; 4-5 जणांकडून मारहाण, कल्याणमधील अर्णव खैरेने घरी येऊन जीवन संपवलं!
ट्रेनमध्ये धक्का लागताच हिंदी-मराठी बोलण्यावरुन वाद; 4-5 जणांकडून मारहाण, कल्याणमधील अर्णव खैरेने घरी येऊन जीवन संपवलं!
सांगलीच्या शौर्य पाटीलचा दिल्लीत आयुष्याचा शेवट; प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळत टोकाचं पाऊल
सांगलीच्या शौर्य पाटीलचा दिल्लीत आयुष्याचा शेवट; प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळत टोकाचं पाऊल
Kagal Nagar Palika Election: कागल नगरपालिकेत भलतीच रंगत, एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता पालकमंत्र्यांची रसद; घेतला तगडा निर्णय, मुश्रीफ विरुद्ध आबिटकर सामना पुन्हा रंगणार
कागल नगरपालिकेत भलतीच रंगत, एकाकी पडलेल्या संजय मंडलिकांच्या मदतीला आता पालकमंत्र्यांची रसद; घेतला तगडा निर्णय, मुश्रीफ विरुद्ध आबिटकर सामना पुन्हा रंगणार
Maharashtra Temperature Today: दक्षिणेत पाऊस उत्तरेत बर्फ, महाराष्ट्रात हवामान पुन्हा बदलणार! पुण्यासह कुठे किती पारा?
दक्षिणेत पाऊस उत्तरेत बर्फ, महाराष्ट्रात हवामान पुन्हा बदलणार! पुण्यासह कुठे किती पारा?
Bihar CM Nitish Kumar Oath मै सत्यनिष्ठा से...  बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारांचा शपथविधी, रचला नवा विक्रम; मोदींनी जवळ येऊन केलं अभिनंदन
मै सत्यनिष्ठा से... बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारांचा शपथविधी, रचला नवा विक्रम; मोदींनी जवळ येऊन केलं अभिनंदन
अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतराचा दावा, पण पोलिस तपासात आली भलतीच माहिती समोर! सोशल मीडियात व्हिडिओ तुफान व्हायरल
अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतराचा दावा, पण पोलिस तपासात आली भलतीच माहिती समोर! सोशल मीडियात व्हिडिओ तुफान व्हायरल
Kagal Politics: कागलचा कट्टर वैरींचा राजकीय दोस्ताना नवा नाहीच अन् गुरु शिष्य वादाची सुद्धा घनघोर परंपरा!
Video: कागलचा कट्टर वैरींचा राजकीय दोस्ताना नवा नाहीच अन् गुरु शिष्य वादाची सुद्धा घनघोर परंपरा!
Prajakta Patil : उज्ज्वला थिटे अनगरला आल्या, तर मी...; बिनविरोध निवडणूक जिंकलेल्या राजन पाटलांच्या सूनबाईंची पहिली प्रतिक्रिया समोर
उज्ज्वला थिटे अनगरला आल्या, तर मी...; बिनविरोध निवडणूक जिंकलेल्या राजन पाटलांच्या सूनबाईंची पहिली प्रतिक्रिया समोर
Embed widget