एक्स्प्लोर

पालघरमध्ये प्रसुतीनंतर महिलेची रक्तासाठी फरफट, एक दिवसाच्या बाळासह पायपीट

रुग्णालयाची अनस्था आणि लॉकडाऊनमुळे वाहनं नसल्याने पालघरमधील महिलेला प्रसुतीनंतर एक दिवसाच्या बाळासह जवळपास सात किमी पायपीट करावी लागली.

पालघर : प्रसुतीनंतर एक दिवसाच्या बाळासह महिलेची रक्तासाठी फरफट झाल्याची घटना पालघरमध्ये घडली. इतकंच नव्हे तर रक्तासाठी तिला आणि तिच्या पतीला बरीच पायपीट करावी लागली आहे. रशिदा खातून असं या महिलेचं नाव असून ती पालघर तालुक्यातील तामसई गावात राहते. आधीच शरीरात रक्ताची असताना या महिलेला बाळासह सुमारे सात किलोमीटर पायपीट करावी लागली

रशिदा खातूनला रविवारी (19 एप्रिल) प्रसुती वेदना सुरु झाल्या. त्यामुळे तिच्या पतीने तिला एका वाहनाने मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात नेलं. तिथे तिची प्रसुती झाली. परंतु तिला रक्ताची गरज भासली. मात्र तिचा रक्तगट सहज उपलब्ध झालं नाही. परिणामी डॉक्टरांनी तिला तिथून हलवण्याचा सल्ला दिला.

कशीबशी रुग्णवाहिका उपलब्ध करुन रशिदा खातून आणि तिच्या पतीने एक दिवसाच्या बाळासह ठाण्यातील शासकीय रुग्णालय गाठलं. मात्र या रुग्णालयात तिथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी रक्ताच्या बदलात रक्त द्या असे त्यांना सांगून निघून जा असे सांगितले. हा परिसराची फारशी जाण नसल्याने एक दिवसाच्या बाळासह ही महिला आणि तिच्याने पतीने ठाण्यावरुन पालघरच्या परतीचा रस्ता पकडला.

मात्र तिथून परतत असताना कोणतेही वाहन नसल्याने बाळासह या पती-पत्नी सुमारे चार किलोमीटर पायपीट केली. पुढे पोलिसांच्या मदतीने एका रिक्षामार्फत त्यांना मनोर येथे पाठवण्यात आले. मात्र रिक्षावाल्यानेही त्यांना मनोर मस्तान नाकापर्यंतच सोडलं. लॉकडाऊनमुळे सर्व खाजगी वाहन बंद असल्याने मनोर मस्तान नाक्याहून तामसई या गावी जाण्यासाठी त्या महिलेला तीन किलोमीटर अंतर पायी कापावं लागलं.

मनोर इथे उपचार घेत असताना आर्थिक स्थिती नसतानाही रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्याकडून तीन हजार रुपये मागितले. ही तर आणखीच दुर्दैवी आणि खेदजनक घटना आहे. हे दाम्पत्य चालत आल्याचे कळाल्यानंतर नागझरी इथल्या सुमित पाटील आणि या दाम्पत्याच्या घरमालकाने रक्तासाठी पालघर येथील डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांच्याकडे मदती मागितली. या आवाहनाला प्रतिसाद देत डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांनी या मातेला आपल्या रुग्णालयात दाखल करुन घेतले. डॉक्टरांच्या आवाहनानंतर काही रक्तदात्यांनी या मातेला रक्तदान करुन तिला रक्त दिले. त्यानंतर तिची आणि बाळाची प्रकृती स्थिर आहे

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 November 2026 : शुक्रवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य
शुक्रवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य
Naigaon : नायगाव रेल्वे स्थानक प्रकरणातील पीडित युवतीला मुलगी मानून बविआचा मदतीचा हात; हितेंद्र ठाकूरांची सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही
पीडित युवतीला मुलगी मानून बविआचा मदतीचा हात; हितेंद्र ठाकूरांची सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
Embed widget