एक्स्प्लोर
Advertisement
Loksabha Election Results | पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून नरेंद्र मोदींचं अभिनंदन
लोकसभा निवडणुकीवेळी इम्रान खान यांनी भारतात पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भारतीय जनतेने पुन्हा नरेंद्र मोदींच्या बाजून कौल दिल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदींचे अभिनंदन केले आहे. इम्रान खान यांनी ट्वीट करत लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल मोदींचे अभिनंदन केले आहे.
'भाजप आणि मित्रपक्षांच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. दक्षिण आशियात शांतता, विकास आणि भरभराटीसाठी त्यांच्यासोबत काम करायला मिळेल अशी अपेक्षा', असं ट्वीट इम्रान खान यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी इम्रान खान यांनी भारतात पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली होती. भाजपने लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला तर भारतासमवेत शांततेची आणि काश्मीर प्रश्नाची चर्चा करण्याची अधिक चांगली संधी उपलब्ध होईल, असे मत इम्रान खान यांनी पत्रकारांशी चर्चा करताना व्यक्त केले होते.I congratulate Prime Minister Modi on the electoral victory of BJP and allies. Look forward to working with him for peace, progress and prosperity in South Asia
— Imran Khan (@ImranKhanPTI) May 23, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement