Asim Munir : ....तर आम्ही अर्ध्या जगाला आपल्यासोबत घेऊन बुडणार; अमेरिकेत बसलेल्या पाक लष्करप्रमुखांची भारताला अणु युद्धाची धमकी
Asim Muneer Threat: पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी स्पष्ट केले की पाकिस्तान एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे आणि जर त्यांना वाटत असेल की ते हरत आहेत तर ते त्यांच्यासोबत अर्धे जग नष्ट करतील.

Asim Muneer Nuclear Threat:अमेरिकेनं भारतावर नव्याने लादलेल्या टॅरिफमुळे हि टक्केवारी आता 50 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर भारताची कोंडी केल्यानंतर दुसरीकडे मात्र अमेरिका आणि पाकिस्तान जवळ येत असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्थानचे लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेला भेट दिली आहे. असे असताना फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकेत बसून पुन्हा एकदा अणु हल्ल्याची धमकी दिली आहे. ते म्हणाले की जर भारताबरोबरच्या युद्धात पाकिस्तानला अस्तित्वाच्या संकटाचा सामना करावा लागला तर ते संपूर्ण जगाच्या अर्ध्याधिक प्रदेशाला अणुयुद्धात ढकलतील. ते म्हणाले, 'आम्ही एक अणुशक्ती असलेला देश आहोत, जर आम्हाला असे वाटत असेल की आम्ही हरत आहोत, तर आम्ही अर्ध्या जगाला आपल्यासोबत घेऊन बुडून जाऊ.' अशी थेट धमकी असे असीम मुनीर यांनी दिली आहे. विशेष म्हणजे हि धमकी अमेरिकेच्या भूमीवरून देण्यात आली आहे.
भारताने सिंधू पाणी करार थांबवला, 2.5 कोटी लोक उपासमारीने मरू शकतात
द प्रिंटच्या बातमीनुसार, मुनीर म्हणाले की, भारताने सिंधू पाणी करार थांबवला आहे, ज्यामुळे 2.5 कोटी लोक उपासमारीने मरू शकतात. परिणामी भारत जेव्हा धरण बांधेल तेव्हा ते दहा क्षेपणास्त्रांनी आम्ही ते नष्ट करू, अशी हि धमकी पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी दिलीय. पाकिस्तानचे फील्ड मार्शल म्हणाले की, सिंधू नदीवर भारताची खाजगी मालकी नाही आणि आमच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही.
अमेरिकेतील समारंभात पाकिस्तानी लष्करप्रमुखांचे भाषण
फ्लोरिडामधील टाम्पा येथे व्यापारी अदनान असद यांनी आयोजित केलेल्या एका प्रतिष्ठित कार्यक्रमात ही धमकी देण्यात आलीय. कुराणातील आयती आणि पाकिस्तानच्या राष्ट्रगीताच्या पठणाने समारंभाची सुरुवात झाली. यावेळी पाहुण्यांना मोबाईल फोन आणि डिजिटल उपकरणे बाळगण्याची परवानगी नव्हती आणि भाषणाचा कोणताही लेखी दस्तऐवज जारी करण्यात आला नाही.
भारताने खेळाडूवृत्ती दाखवली पाहिजे- मुनीर
मुनीर यांनी भारताला युद्धातील नुकसान स्वीकारण्याचा सल्ला दिला आणि सांगितले की, खेळाडूवृत्ती दाखवली पाहिजे. ते म्हणाले की, पाकिस्तान पूर्व भारतातून हल्ला करेल, जिथे भारताची मौल्यवान संपत्ती आहे आणि नंतर पश्चिमेकडे जाईल. त्यांनी भारताची तुलना एका चमकणाऱ्या मर्सिडीज कारशी आणि पाकिस्तानची तुलना रेतीने भरलेल्या डंप ट्रकशी केलीय आणि सांगितले की जर ट्रक कारला धडकला तर कोण हरेल. असा सवाल त्यांनी यावेळी करत टीका केली.
पाकिस्तान इस्लामिक कलमाच्या आधारावर बांधलेला एकमेव देश
धार्मिकदृष्ट्या रूढीवादी मुनीर म्हणाले की, पाकिस्तान हा इस्लामिक कलमाच्या आधारावर बांधलेला एकमेव देश आहे आणि म्हणूनच अल्लाह त्याला ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधनांनी आशीर्वाद देईल. ते म्हणाले की, पाकिस्तानला मदीनाप्रमाणे वाचवले जाईल, जिथे पैगंबर मुहम्मद यांनी इस्लामिक राजवटीचा पाया घातला होता.
इतर महत्वाच्या बातम्या























