Online Gaming Bill 2025: आपापले पैसे काढून घ्या..., ड्रीम 11 कडून आवाहन; संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर होताच मोठा निर्णय
Online Gaming Bill 2025: संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर होताच आता ड्रीम-11 ने देखील मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. पे टू प्ले हा ऑप्शन रद्द केला आहे.

Online Gaming Bill 2025: संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक (Online Gaming Bill 2025) मंजूर झालं आहे. लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर काल (21 ऑगस्ट) राज्यसभेतही विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. दरम्यान आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी पाठवण्यात येईल. ऑनलाईन गेमिंगबाबत विधेयक मंजूर होताच अनेक गेम्सने रिअल-मनी गेम्स थांबवलेत. दरम्यान या विधेयकामुळे ड्रीम-11 (Dream 11), रमी, पोकरसारखे ऑनलाईन गेमही बंद होण्याची शक्यता आहे. ड्रीम-11 सध्या भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रयोजक आहे. पैशांचा समावेश असलेल्या ऑनलाईन गेमिंगमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होतंय. ऑनलाईन गेमिंगमुळे काहींनी आत्महत्या केल्याचंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.
संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर होताच आता ड्रीम-11 ने देखील मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. पे टू प्ले हा ऑप्शन रद्द केला आहे. तसेच ड्रीम-11 ॲप वापरणाऱ्या सर्वांनीचं आपापले पैसे काढून घ्यावेत, असे आवाहनही कंपनीकडून करण्यात आलं आहे. तुमच्या खात्यातील पैसे कुठेही जाणार नाहीत. ते सुरक्षित आहेत. तसेच तुम्हाला ड्रीम-11 ॲपमधून ते काढून घेता येतील, असेही या कंपनीने सांगितले आहे. दरम्यान, ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली सट्टेबाजी आणि जुगाराला प्रोत्साहन देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. तथापि, यामुळे, रिअल मनी फॉरमॅटमध्ये डिझाइन केलेले अनेक भारतीय अॅप्स आणि गेमिंग प्लॅटफॉर्म देखील आहेत.
This Bill, passed by both Houses of Parliament, highlights our commitment towards making India a hub for gaming, innovation and creativity. It will encourage e-sports and online social games. At the same time, it will save our society from the harmful effects of online money… https://t.co/t1iUuH9JP1
— Narendra Modi (@narendramodi) August 21, 2025
टीम इंडियाच्या जर्सीवर ड्रीम-11 ची जाहीरात-
सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास आलेली ड्रीम-11 गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटमध्येही सक्रिय झाली होती आणि परिणामी 2023 मध्ये ड्रीम-11 ने बीसीसीआयसोबत 358 कोटी रुपयांचा करार केला. या करारामुळे ही कंपनी भारतीय क्रिकेट संघाची टायटल प्रायोजक बनली आणि तेव्हापासून टीम इंडियाच्या जर्सीवर ड्रीम-11 चे नाव लिहिले गेले आहे. हा करार 3 वर्षांसाठी होता जो 2026 मध्ये संपणार आहे. पण त्याआधीही हे विधेयक मंजूर झाल्यामुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. बीसीसीआय आणि ड्रीम-11 मधील या कराराला १ वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआयला 358 कोटी रुपयांच्या निम्म्याहून अधिक रक्कम आधीच मिळाली आहे, परंतु उर्वरित रक्कम हा करार पूर्ण होतो की नाही यावर अवलंबून असेल.
आयपीएलवरही होणार परिणाम-
केवळ ड्रीम-11 चं नाही तर दुसरी मोठी ऑनलाइन गेमिंग कंपनी माय सर्कल-11 वर देखील याचा परिणाम होईल. कारण या कंपनीचा बीसीसीआयशीही करार आहे. भारतीय बोर्डाची लीग, आयपीएलने 2024 मध्ये 5 हंगामांसाठी या कंपनीसोबत करार केला होता, ज्या अंतर्गत माय सर्कल-11 या लीगचे मुख्य फॅन्टसी गेमिंग प्रायोजक बनले. दोघांमधील हा करार 625 कोटी रुपयांचा होता, म्हणजेच बीसीसीआयला दरवर्षी कंपनीकडून 125 कोटी रुपये मिळत आहेत. फक्त 2 हंगाम झाले आहेत आणि 3 हंगामांसाठीचा करार शिल्लक आहे. अशा परिस्थितीत, नवीन नियमांच्या आधारे कंपनी पुढे काय निर्णय घेते यावरही या कराराचे भविष्य अवलंबून असेल.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
संबंधित बातमी:
राज्यसभेतही ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर; लोकसभेत 120 तासांऐवजी फक्त 37 तास चर्चा, 12 विधेयके मंजूर

























