एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पैज दोन शास्त्रज्ञांची, भारतीय शास्त्रज्ञांच्या सिद्धांताला न्यूझीलंड शास्त्रज्ञांचे आव्हान
पुणे: आपण लहानसहान गोष्टीवरुन सर्रास पैज लावतो. मात्र, जेव्हा दोन शास्त्रज्ञ पैज लावतात, तेव्हा विज्ञान वर्तुळात एक नवा सिद्धांत जन्माला येतो. अशीच एक पैज भारतीय आणि न्यूझीलंडच्या शास्त्रज्ञामध्ये लागली. तब्बल दशकभरानंतर या पैजेमुळे कित्येक वर्ष न उलगडलेल्या कोड्याची उकल झाली.
पुण्यातील आयुकाचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. टी. पद्मनाभम आणि न्यूझीलंडचे जगविख्यात शास्त्राज्ञ डॉ. डेव्हिड विल्टशायर यांच्यात 2006 मध्ये झालेल्या टेक्सासमध्ये झालेल्या शिबिरानंतर तब्बल 200 अमेरिकन डॉलरची पैज लागली होती. या दोन जगविख्यात खगोलशास्त्रज्ञांनी डार्क एनर्जी म्हणजेच आयनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतावर एकमेकांना आव्हान दिलं होतं.
डार्क एनर्जीचा सिद्धांत काय?
वास्तविक, 1990 मध्ये विश्व प्रसरण पावत असल्याच्या सिद्धांतावर शिक्कामोर्तब झालं. त्यानंतर विश्वाच्या प्रसरणामागे कृष्ण एनर्जी म्हणजेच डार्क एनर्जी किंवा आइनस्टाइनचा सापेक्षतवादाचा सिद्धांत असावा असे मानले जाऊ लागले.
डार्क एनर्जी ही अवकाशातील कॉस्मोलॉजिकल कॉन्स्टन्ट, म्हणजेच अवकाशातील अणुंच्या संख्येवर अवंलबून असतात. अणुंची ही संख्या मोजता येऊ शकते, असा सिद्धांत पद्मनाभम यांनी 2006 साली टेक्सासमधील शास्त्रज्ञांच्या शिबिरात मांडला होता.
यावेळी न्यूझीलंडच्या विल्टशायर यांनी पद्मनाभम यांची थिअरी स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यांच्याशी पैज लावली. त्या पैजेला 10 वर्षे लोटली असून, दशकभरानंतर पद्मनाभम यांची थिअरीच योग्य असल्याचं विल्टशायर यांनी मान्य केलं.
डॉक्टर पद्मनाभन यांनी ही पैज जिंकली असली तरी, 200 डॉलरचा दिवा जिंकण्यापेक्षा, आपण मांडलेल्या वैज्ञानिक सिद्धांताची जागतिक पातळीवर दखल घेतली जात आहे, याचा पद्मनाभम यांना जास्त आनंद आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement