Nipah Virus : केरळमध्ये निपाह व्हायरसचे संकट; कोणत्याही विषाणूजन्य आजाराची सुरूवात केरळमधूनच का होते? काय आहे यामागील कारण?
केरळमधील निपाह रुग्णांची संख्या 5 वर गेली आहे. हा विषाणू केरळमध्ये जोरदार पसरत आहे. मात्र या रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोशल मिडीयावर अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, विषाणूची सर्वाधिक प्रकरणे केरळमध्येच का सुरू होतात.
Nipah Virus : केरळमधील निपाह रुग्णांची संख्या 5 वर गेली आहे, त्यामुळे केरळमधील आरोग्य व्यवस्था सतर्क झाली आहे. कोरोनाप्रमाणेच हा विषाणू एका पाठोपाठ एक माणसांचा बळी घेत आहे. हा विषाणू केरळमध्ये जोरदार पसरत आहे. मात्र या रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोशल मिडीयावर अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, विषाणूची सर्वाधिक प्रकरणे केरळमध्येच का सुरू होतात.
हा प्रश्न केवळ निपाह किंवा कोरोना संदर्भातीलच नाही तर याआधी देखील इन्फ्लूएन्झा, हिपॅटायटीस बी, रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस, कायसनूर फॉरेस्ट डिसीज व्हायरस, कॉक्ससॅकी व्हायरस टाइप बी 3, गोवर व्हायरस, हिपॅटायटीस ए व्हायरस, झिका व्हायरस, डेंग्यू व्हायरस, लेप्टोस्पायरोसिस, स्वाईन फ्लू, चिकनगुनिया व्हायरस, नाईल विषाणू, जपानी एन्सेफलायटीस आणि मानवी एडेनोव्हायरसनेही केरळमध्ये कहर केला होता.
देशातील सर्व राज्याचा विचार केला तर केरळ हे सर्वात शिक्षित राज्य मानले जाते. केरळमध्ये साक्षरतेचे प्रमाण तब्बल 94 टक्के आहे. येथे राहत असणाऱ्या कुटुंबामध्ये एकतरी सदस्य हा बाहेरील देशात काम करणारा आहे. याच कारणामुळे या राज्यात सर्वाधिक विषाणूजन्य आजार आढळून येतात. ज्या राज्यातील आणि शहरातील लोक परदेशात राहतात अशा ठिकाणी विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो. केरळ हे सर्वाधिक साक्षर राज्य आहे, त्यामुळे तेथील लोक जागरूक आहेत. त्यामुळेच येथील लोक विषाणूचा प्रसार होऊ देत नाहीत. येथील लोक अशा वेळेस योग्य ती काळजी घेतात. जेव्हा हाच विषाणू इतर राज्यांमध्ये पोहोचतो तेव्हा तो कहर करतो.
केरळमध्ये 2018 मध्येही झाला होता निपाहचा फैलाव (There Was An Outbreak Of Nipah In Kerala In 2018 As Well)
निपाह विषाणूचा संसर्ग माणसामधून माणसात पसरतो. 2018 मध्ये केरळमध्ये पहिल्यांदा निपाह संसर्ग पसरला, त्यावेळी निपाहमुळे 18 पैकी 17 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा निपाहचा संसर्ग पसरल्याने भीतीचं वातावरण आहे, नंतर 2019 आणि 2021 मध्ये देखील केरळमध्ये निपाह रुग्ण आढळले होते.
केरळमध्ये मिनी लाॅकडाऊन
निपाहाचा वाढता संसर्ग पाहता केरळमध्ये मिनी लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दररोज लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टींची दुकानं सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त मेडीकल आणि दवाखाने कोणत्याही वेळेची मर्यादा नाही.