Pune Ganeshotsav 2023 : तळीरामांनो तारखा लक्षात ठेवा! गणेशोत्सवामुळे 19 आणि 28 सप्टेंबरला पुण्यात मद्यविक्री बंद राहणार
पुण्यात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी 19 आणि 28 सप्टेंबरला दारु विक्रीवर बंदी करण्यात आली आहे.
![Pune Ganeshotsav 2023 : तळीरामांनो तारखा लक्षात ठेवा! गणेशोत्सवामुळे 19 आणि 28 सप्टेंबरला पुण्यात मद्यविक्री बंद राहणार Pune Ganeshotsav 2023 liquor sales will be closed in pune during ganeshotsav Pune Ganeshotsav 2023 : तळीरामांनो तारखा लक्षात ठेवा! गणेशोत्सवामुळे 19 आणि 28 सप्टेंबरला पुण्यात मद्यविक्री बंद राहणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/14/3d01aa64a2a558767ab54063eef186731694697297074442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यात गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी 19 आणि 28 सप्टेंबरला दारु विक्रीवर बंदी करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरात शांतता रहावी यासाठी हे आदेश काढण्यात आले आहे.
जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्रीच्या सर्व अनुज्ञप्ती 19 आणि 28 सप्टेंबर रोजी बंद राहतील. तसेच 29 सप्टेंबरला पुणे महानगरपालिका क्षेत्रात विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील आणि गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी गणपती विसर्जन असलेल्या क्षेत्रात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
19 सप्टेंबर आणि 28 सप्टेंबर दोन्ही पूर्ण दिवस पूर्ण पुणे जिल्हा, 29 सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मद्यविक्री परवाना धारकांना दुकानं बंद ठेवण्यासाठी सांगण्यात आलं आहे. गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. ज्या भागात पाचव्या आणि सातव्या दिवशी गणेश विसर्जन होते, अशा भागातीलदेखील दुकानं बंद ठेवावे. याशिवाय ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुका असेल, त्या त्या ठिकाणी विसर्जन मिरवणूक मार्गावरील सर्व भागातील मद्य विक्री विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी बंद ठेवावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
विसर्जनाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरात दारु विक्रीला बंदी करण्यात आली आहे. सगळ्या दारु विक्रेत्यांना या संदर्भातच्या सुचना देण्यात आल्या आहे. या आदेशाचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाणार असल्याचंही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यभरात यंदा गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी पुणे पोलिसांकडून देखील जय्यत तयारी केली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियम आणि नियोजन पुणे पोलिसांनी आखले आहेत. गणेशोत्सवाला कोणतंही गालबोट लागू नये, यासाठी प्रशासन तत्पर असणार आहे.
गणेश मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सूचना
शहर पोलिसांनी सार्वजनिक सुरक्षा आणि सुरक्षेसाठी आणि शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी योग्य पावलं उचलली आहेत. त्यांनी शहरातील 2,500 हून अधिक गणेश मंडळांना त्यांच्या मंडपात आणि आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय शहर पोलिसांनी 800 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत आणि पुणे महानगरपालिकेने (PMC) स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आणखी 500 कॅमेरे बसवले आहेत, असे एकूण 1,300 सीसीटीव्ही कॅमेरे आधीपासूनच परिसरात आहेत.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)