एक्स्प्लोर

लेडीज बार, पब-हुक्का पार्लरवरील कारवाईस भाजप आमदार गणेश नाईकांमुळे ब्रेक, सरसकट कारवाई करण्यास विरोध 

Ganesh Naik : भाजप आमदार गणेश नाईक यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन होणार की स्थानिक आमदाराचा शब्द चालणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवी मुंबई: गुन्हेगारीकरण वाढण्यास कारणीभूत ठरत असलेल्या शहरातील बारवर बुलडोझरने तोडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले होते. यानुसार नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलाश शिंदे (Navi Mumbai Commissioner Kailash Shinde)  यांनी शहरातील लेडीज बार, पब, हुक्का पार्लरवर कारवाईचा धडाका लावला होता. मात्र आता या कारवाईस भाजपा आमदार गणेश नाईक (Ganesh Naik)  यांनी ब्रेक लावला आहे. सरसकट कारवाई करण्यास नाईकांनी विरोध दर्शवला आहे. 

पुणे येथे ड्रंक ॲंड ड्राईव्हची केस घडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने अवैध बार, पब, हुक्का पार्लर, लेडिज बारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील अनधिकृत, परवाना नसलेल्यांवर बुलडोझरने तोडक कारवाई करण्याचे आदेश सोडण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे आदेश असल्याने नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त कैलाश शिंदे यांनी शहरातील पब संस्कृती मोडीत काढण्यासाठी कारवाईचा धडाका लावला होता. 

सीबीडीपासून दिघ्यापर्यंत असलेल्या लेडीज बार, पबवर बुलडोझर फिरवण्यात आले. रात्रभर चालणाऱ्या या तोडक मोहिमेत जवळपास 50 लेडिज बार, पब, हुक्का पार्लरचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलेले आहे.

गणेश नाईकांच्या विरोधानंतर कारवाई थांबली 

प्रशासनाचा कारवाईचा धडाका सुरू असतानाच  भाजपा आमदार गणेश नाईक यांनी विरोध केल्याने त्याला ब्रेक लागला आहे. वाशी, कोपरखैरणे भागातील 15 लेडीज बार, पबवर कारवाई करण्यास गेलेल्या पथकास नाईकांच्या विरोधामुळे परत फिरावे लागले आहे. महानगरपालिका आयुक्त कैलाश शिंदे यांना फोन करून कारवाई थांबवा अशी मागणी करण्यात आल्याने गेली दोन दिवस झाले शहरातील बार, पब विरोधातील कारवाई थांबली आहे. गणेश नाईकांनी कारवाई विरोध केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

आधी नोटीस द्या आणि वेळ द्या

दरम्यान याबाबत गणेश नाईक यांना विचारले असता आपण कारवाई थांबवली असल्याचं त्यांनी सांगितले. सरसकट सर्वच बार, पबवर कारवाई करण्यास आपला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या मालकांनी अनधिकृत बांधकाम केले असेल त्यांना पालिकेने नोटीस द्यावी. केलेले अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढण्यास वेळ द्यावा अशी सूचना गणेश नाईक यांनी केली आहे. 

गणेश नाईक यांनी घेतलेल्या भुमिकेनंतर पब-बारवरील कारवाई सध्या थंड बस्त्यात गेली आहे. मात्र यावर महानगर पालिका अतिक्रमण विभाग काय भूमिका घेणार, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन होणार की स्थानिक आमदारांचा शब्द चालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Crime News : आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget