एक्स्प्लोर
विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, नवऱ्यासह चौघांना अटक

नाशिक: विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूनंतर संतप्त झालेल्या माहेरच्यांनी सासरच्यांच्या अंगणातंच महिलेचे अंत्यसंस्कार केले आहेत. नाशिकच्या पिंपळद गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. वृषाली अनर्थ असं संशयास्पद मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. वृषालीच्या सासरच्यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती. मात्र, 3 दिवसानंतर वृषालीचा मृतदेह घराबाहेरच्या विहिरीत आढळला. संतप्त झालेल्या माहेरच्यांनी सासरच्यांच्या अंगणात वृषालीचे अंत्यसंस्कार केले. या घटनेनंतर पोलीसही ताळ्यावर आले असून, वृषालीच्या पतीसह चौघांना अटक करण्यात आली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
पुणे
धुळे























