एक्स्प्लोर
नाशिकच्या जि. प. शाळेतील विद्यार्थी भरवर्गात पत्ते खेळण्यात दंगं
नाशिक जिल्ह्यातल्या टाकेघोटी इथल्या आदर्श शाळेत शिक्षक आणि मुख्यध्यापकांचा पत्ता नसतो. त्यामुळं मुलं पत्त्यांचे डाव खेळत बसतात.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातल्या टाकेघोटी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा गौरव आदर्श शाळा म्हणून होतो. पण सध्या या शाळेत शिक्षकांचा पत्ता नाही आणि मुलं अभ्यास करण्याऐवजी पत्ते खेळण्यात गुंग असल्याचं चित्र आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या टाकेघोटी इथल्या आदर्श शाळेत शिक्षक आणि मुख्यध्यापकांचा पत्ता नसतो. त्यामुळं मुलं पत्त्यांचे डाव खेळत बसतात, अशी माहिती काही पालकांना मिळाली होती. त्यानुसार शिक्षक पालक समितीच्या काही सदस्यांनी अचानकपणे शाळेवर धडक दिली. त्यावेळी विद्यार्थी पत्त्यांचा डाव रंगवून बसल्याचं पाहायला मिळालं.
पालकांची अचानक पडलेली धाड पाहून विद्यार्थ्यांची पळापळ झाली. त्यानंतर या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी मुख्यध्यापक धाव घेतली, तर त्यांनी शिक्षकांना जाब विचारण्याऐवजी पत्ते खेळणाऱ्या विद्यार्थ्यांनाच छडीचा प्रसाद देण्यात धन्यता मानली.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
वर्धा
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement