एक्स्प्लोर
अधिकृत फेरीवाल्यांना हटवणं गैर: संजय राऊत
ज्या फेरीवाल्यांना महापालिकेने परवानगी दिली आहे, त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.
![अधिकृत फेरीवाल्यांना हटवणं गैर: संजय राऊत Sanjay Raut On Hawkers अधिकृत फेरीवाल्यांना हटवणं गैर: संजय राऊत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/16184235/sanjay-raut.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक: फेरीवाल्यांवरुन सुरु असलेल्या वादात आता शिवसेनेने उडी घेतली आहे. शिवसेना अधिकृत फेरीवाल्यांच्या पाठिशी उभी राहणार आहे.
ज्या फेरीवाल्यांना महापालिकेने परवानगी दिली आहे, त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.
ज्यांच्याकडे परवाने आहेत, त्यांना व्यवसाय करु द्यावा, त्यांचाही पोटापाण्याचा प्रश्न आहे, असं राऊत म्हणाले. ते येवल्यात बोलत होते.
“ज्यांच्याकडे परवाने आहेत, ते अधिकृत आहेत. त्यांना व्यवसाय करण्याचा, जगण्याचा अधिकार आहे. त्यांचं हातावर पोट आहे. ज्यांच्याकडे परवाने आहेत, त्यांच्याविरोधात कोणालाही भूमिका घेणं परवडणारं नाही” असं संजय राऊत म्हणाले.
फेरीवाल्यांबाबतच्या या भूमिकेमुळे आता शिवसेना आणि मनसे आमने सामने येण्याची शक्यता आहे.
कारण राज ठाकरेंनी यापूर्वीच अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीनंतर राज ठाकरेंनी फेरीवाल्यांना हटवण्यासाठी प्रशासनाला 15 दिवसांची मुदत दिली होती. मात्र फेरीवाल्यांना न हटवल्याने मनसेने फेरीवाल्यांना हटवण्यास सुरुवात केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)