एक्स्प्लोर
रोहित, हार्दिक, कन्हैया देशातील तरूणांचे हिरो, उद्धव ठाकरेंचा भाजपला घरचा आहेर

नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. “हार्दिक पटेल, कन्हैया कुमार हे तरुण देशातील तरुणाईचं नेतृत्त्व करत आहेत. पण भाजप सरकार तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.” अशा अनुषंगाचं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंनी कन्हैया कुमारचं समर्थन केलं आहे. ते आज नाशिकमध्ये बोलत होते. सरकारनं कन्हैया कुमार आणि हार्दिक पटेलला देशद्रोही ठरवून चूक केली आहे. देशातली तरुणांची संख्या मोठी असून सरकारनं त्यांचं मत विचारात घेणं गरजेचं असल्याचं उद्धव म्हणाले. सरकारविरोधात आंदोलन पुकारणाऱ्या तीन तरुणांना हिरो करून उद्धव ठाकरेंनी भाजपला चांगलाच दणका दिला आहे.. आता उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर भाजपची काय प्रतिक्रिया असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Before You Go
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















