एक्स्प्लोर
Advertisement
BMW ला कट मारल्याने जाब विचारला, बिल्डरला रिक्षाचालकांची मारहाण
रिक्षाचालकांच्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिक सचिन गणोरे जखमी झाले आहेत
नाशिक : रिक्षाचालकांच्या टोळक्याने एका बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण केल्याची घटना नाशकात समोर आली आहे. बीएमडब्ल्यू कारला कट मारल्याचा जाब विचारल्यावरुन ही मारहाण झाल्याची माहिती आहे.
मारहाणीत बांधकाम व्यावसायिक सचिन गणोरे जखमी झाले आहेत. या प्रकरणी रिक्षाचालक प्रल्हाद बनसोडेला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे.
उलट दिशेनं येऊन कट का मारला? अशी विचारणा गणोरे यांनी रिक्षाचालकाला केली. याचाच राग मनात धरुन रिक्षाचालकांच्या टोळक्यानं त्यांच्यावर दगडानं हल्ला केला. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कॉलेज रोडवर ही घटना घडली.
यावेळी रिक्षाचालकानं पत्नीलाही शिवीगाळ केल्याची तक्रार गणोरे यांनी केली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सध्या पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement