एक्स्प्लोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी आणखी एक रेल्वे रेक उपलब्ध होणार
नाशिक : कांदा उत्पादकांसाठी अतिरिक्त रेल्वे रेक उपलब्ध करुन देण्याची मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मान्य केली आहे. नाशिकच्या कांदा उत्पादकांना रेल्वेतर्फे सोमवारपासून दररोज आणखी एक रेक उपलब्ध करून दिला जाणार आहे.
सध्या दररोज चार रेक दिल्या जात असून, आणखी रेक वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. यंदा कांद्याचं भरघोस पीक आलं असून, त्याची वाहतूक करण्यासाठी अधिक रेल्वे रेक मिळण्याची मागणी कांदा उत्पादकांकडून करण्यात आली होती.
https://twitter.com/sureshpprabhu/status/833493524515393536
या मागणीला रेल्वेमंत्र्यांनी प्रतिसाद दिला आहे. नाशिक जिल्ह्यातून कांदा पूर्व, उत्तर, ईशान्य आणि पूर्वेकडील किनारी भागात पाठवला जाणार आहे. त्यामुळे कांदा निर्यात करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांचे आदेशामुळे उत्पादकांना मोठा फायदा होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement