एक्स्प्लोर
पेट्रोल दरवाढीवर उतारा, घोड्यावरुन दूधवाटप
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर नाशिकच्या शेतकऱ्यांनी नामी शक्कल लढवलीय. इगतपुरी तालुक्यातील बेळगाव कुरहे गावातील काळू गोवर्धने या तरुण शेतकऱ्यांने चक्क घोड्यावरुन दूध वाटप सुरु केलंय.
नाशिक : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर नाशिकच्या शेतकऱ्यांनी नामी शक्कल लढवलीय. इगतपुरी तालुक्यातील बेळगाव कुरहे गावातील काळू गोवर्धने या तरुण शेतकऱ्यांने चक्क घोड्यावरुन दूध वाटप सुरु केलंय.
दररोज होणारी इंधन दरवाढ परवडत नसल्यानं काळूने गाडी वापरणं बंद केलं आणि घोड्यावरुन दूध वाटप सुरु केलं. पंचक्रोशीत हा विषय चर्चेचा ठरलाय.
काळूकडे 18 म्हशी आहेत. त्यातून दिवसाकाठी 80 लिटर दूध मिळतं. त्यातील साधारणत: 20 लिटर दूध काळू घरोघरी जाऊन वाटतो, तर उरलेलं दूध डेअरीला देतो. एक दीड महिन्यापासून इंधनाचे दर वाढत गेल्यानं त्याचा खर्च वाढत होता. त्यामुळे त्याने घोड्याचा खुराक कमी असल्यानं त्याने शक्कल लढवली.
तसेच, लग्नसराईच्या काळात या घोड्यावरुन नवरदेवाची मिरवणूक काढून दोन पैसे जोडतो. आस्मानी सुलतानी संकट, खत बियाणांच्या वाढत्या किंमती यामुळे न परवडणाऱ्या शेतीला पूरक व्यवसाय शोधला आणि तोही इंधन दरवाढीमुळे परवडणारा नसल्यानं त्याने घोड्यावरस्वार होवून दूध वाटपाचा पर्याय शोधला.
नाशिकच्या या तरुणाने इंधन दरवाढीवर उतारा म्हणून शोधलेली ही नामी शक्कल जरी कुतुहलजनक वाटत असली, तरी सर्वसामान्य जनतेला इंधन दरवाढीचा कसा फटका बसतोय, याचं नेमकं उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहता येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement