एक्स्प्लोर
VIDEO : दहावीच्या विद्यार्थिनीला प्रपोज, शिक्षकाला पालकांचा चोप
शिक्षकाने दहावीतील विद्यार्थिनीला प्रपोज केल्याचा प्रकार घडला असून संतप्त पालकांनी आरोपीला बेदम मारहाण केली.

नाशिक : नाशकात शिक्षकाने गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना समोर आली आहे. शिक्षकाने दहावीतील विद्यार्थिनीला प्रपोज केल्याचा प्रकार घडला असून संतप्त पालकांनी आरोपीला बेदम मारहाण केली. नाशिकच्या सेंट फ्रान्सिस शाळेत ही घटना घडल्याची माहिती आहे. शिक्षक सुनिल कदम याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रपोज केलं. नकार दिल्यास नापास करण्याची धमकी दिल्याचा आरोप शिक्षकावर आहे. विद्यार्थिनीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार सुनिल कदम या आरोपी शिक्षकावर नाशकातील इंदिरानगर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही गोष्ट समजताच शाळेतील इतर संतप्त पालकांनी शाळेत घुसून शिक्षकाला तुफान मारहाण केली. काही जणांनी शिक्षकाला चोप दिला, तर कोणी खुर्ची फेकून मारली. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. पाहा व्हिडिओ :
नाशकात शिक्षकाकडून दहावीतील विद्यार्थिनीला प्रपोज, संतप्त पालकांची आरोपीला बेदम मारहाण pic.twitter.com/hpfe2Vys7S
— ABP माझा (@abpmajhatv) June 1, 2018
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























