एक्स्प्लोर
नाशिक मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या, कामाच्या ताणाचा उल्लेख
संजय धारणकर यांनी कामाच्या ताणामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे.
![नाशिक मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या, कामाच्या ताणाचा उल्लेख Nashik Municipal corporation officer commits suicide, note says stress at workplace latest update नाशिक मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या, कामाच्या ताणाचा उल्लेख](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/02185245/Sanjay-Dharankar-Nashik-Suicide.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : नाशिक महापालिकेतील अधिकाऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संजय धारणकर यांनी कामाच्या ताणामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे.
संजय धारणकर हे घरपट्टी विभागात सहाय्यक अधीक्षक पदावर कार्यरत होते. नाशकातील गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर जवळ ऋषिराज पार्कमध्ये धारणकर राहत होते. मात्र आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं.
पोलिसांना मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये 'कामाच्या ताण तणावामुळे मी सोडून जातोय' असा उल्लेख होता. दीर्घ रजेनंतर ते कालच कामावर रुजू झाले होते.
धारणकरांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे पालिकेत खळबळ उडाली आहे. गंगापूर पोलिसांकडून या प्रकरणाचा पंचनामा सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
शिक्षण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)