एक्स्प्लोर
तुकाराम मुंढेंचा दणका, सात बड्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश
किशोर बोर्डे हे परसेवेतील अधिकारी असल्याने, त्यांच्या चौकशीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाणार आहे. शासनाने परवानगी दिल्यानंतरच बोर्डेंची चौकशी केली जाईल.
![तुकाराम मुंढेंचा दणका, सात बड्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश Nashik Municipal Commissioner Tukaram Mundhe orders inquiry of 7 officers तुकाराम मुंढेंचा दणका, सात बड्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/29141845/Tukaram-Mundhe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : आपल्या धडाकेबाज कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या आयएएस तुकाराम मुंढे यांनी आता नाशिक महापालिकेच्या सात बड्या अधिकाऱ्यांना दणका दिलाय. कामातील अनियमततेप्रकरणी अतिरिक्त आयुक्तांसह सात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेत.
गंगापूर रोडवरील बहुचर्चित ग्रीन फिल्ड प्रकरणासह इतर प्रकरणात तुकाराम मुंढेंनी अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिलेत. सातही अधिकऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकरणात अनियमिततेप्रकरणी दोषारोप निश्चित करत विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव मुंढेंनी तयार केला असून, तो प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी पाठवलाय.
कुणा-कुणाच्या चौकशीचे आदेश?
- अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे
- अतिक्रमण निर्मुलन विभागाचे उपायुक्त आर. एम. बहिरम
- नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण
- माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी
- माजी शहर अभियंता यू. बी. पवार
- माजी अग्निशमन अधिकारी अनिल महाजन
- लेखाधिकारी घोळप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)