एक्स्प्लोर
नाशिक-मुंबई रेल्वे वाहतूक उशिरा, खर्डीजवळ इंजिनात बिघाड

नाशिक: खर्डी इथं मालागाडीचं इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचा परिणाम नाशिक-मुंबई रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. सेवाग्राम, गोदावरी, शताब्दी या एक्सप्रेस सुमारे अडीच तास उशीराने धावत आहेत. कसाऱ्यावरुन पर्यायी इंजिन पाठवण्यात आलं. त्यामुळे बंद पडलेली मालगाडी रुळावरून हटवण्यात यश आलं आहे. त्यामुळे सध्या मालगाडी मार्गस्थ झाली आहे. सध्या मुंबई- नाशिक रेल्वेमार्ग सुरु झाला आहे, मात्र रात्री उशिरापर्यंतच्या रेल्वे गाड्या अडीच ते 3 तास उशिरा धावणार आहेत.
Before You Go
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















