एक्स्प्लोर
नाशकात दुहेरी हत्याकांड, सासू-भाच्याचा जीव घेऊन जावई फरार
नाशिक : दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने नाशिक हादरलं आहे. पंचवटी भागात तरुणाने सासू आणि मेहुणीच्या मुलाची हत्या केली, तर हल्ल्यात सासरे जखमी झाले आहेत.
मोतीराम बदादे असं आरोपीचं नाव असून घटनेनंतर तो फरार झाला आहे. मोतीरामने सासू मंदाबाई खराते आणि मेहुणीच्या मुलाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. बदादेने सतत पैशाची मागणी केल्यामुळे झालेल्या वादातून हे हत्याकांड घडलं.
सासू आणि भाच्याची हत्या केल्यानंतर आरोपीने सासऱ्यांवरही धारदार शस्त्राने वार केले. सासरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आरोपी मोतीराम बदादे फरार झाला आहे.
नाशिकच्या पंचवटी भागातील रामवाडी परिसरात ही घटना घडली आहे. पंचवटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
क्राईम
Advertisement