एक्स्प्लोर
रिक्षात बसवून लहान मुलांना लुटणारा खंडवा अखेर गजाआड
नाशिक : रिक्षात बसवून मुलांना लुटणाऱ्या निलेश सोनावणे उर्फ खंडवाची गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड दहशत होती. अखेर नाशिक पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास करणारा पार्थ हातवळणे या विद्यार्थ्याला खंडवानं असंच लुटलं.
खंडवाविरोधात अनेक तक्रारी येत होत्या, मात्र पोलिसांना तो कायम हुलकावणी द्यायचा. अखेर सापळा रचून पोलिसांनी त्याला गजाआड केलं. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे.
निलेश सोनावणे उर्फ खंडवा पोलिसांच्या हातात आला आहे. मात्र बंदुकीचा धाक दाखवून लुटणाऱ्यांची संख्या नाशिकमध्ये कमी नाही. अशा गुन्ह्यांना आळा घालण्याचं आव्हान नाशिक पोलिसांसमोर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement