Nashik: दोन दिवसांत दोन बिबटे जेरबंद, तरीही नाशिक जिल्ह्यात दहशत कायम
Forest Department: सिन्नर तालुक्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून बिबट्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
Nashik News Updates: शहरासह जिल्ह्यात बिबट्याचा वावर नित्याचा झाला असून रोज कुठे ना कुठे बिबट्याचे दर्शन होत आहे. अशातच जिल्ह्यातील सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यात दोन बिबटे दोन दिवसांत जेरबंद करण्यात वनविभागाला यश ( Two leopards jailed in two days in Nashik) आले आहे.
नाशिकसह जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, निफाड भागात बिबट्याचा संचार दिवसाढवळ्या वाढला असून बिबट्याने डरकाळीने परिसर दणाणून सोडला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनावर बिबटे हल्ला करत असून अनेक शेतकरी दुचाकीवरून जात असताना त्यांना देखील बिबट्याचा सामना करावा लागत आहेत. अशातच आज सिन्नर तालुक्यातील चोंढी येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना पहाटे उघडकीस आली. डरकाळ्यांनी परिसर दणाणून गेल्यानंतर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे शेतकऱ्यांचे निदर्शनात आले.
बिबट्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत
गेल्या महिन्यापासून सिन्नर तालुक्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून बिबट्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सुमारे पाच वर्षे वयाचा नर बिबट्या पिंजयात अडकल्यानंतर जोरजोरात पिंजऱ्याला धडका देऊ लागला. कर्णभेदी डरकाळ्यांनी बिबट्याने परिसर दणाणून सोडला. बिबट्याने पिंजऱ्याला धडका दिल्याने बिबट्याला किरकोळ दुखापत झाली. पहाटे घटनेची माहिती कडभाने यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली.
बिबट्याचा वावर, परिसरात दहशत...
चोंढी परिसरात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर होता. गेल्या काही दिवसांपूर्वी दुचाकीस्वारांवर हल्ला करण्याच्या घटनाही घडल्या होत्या. परिसरात बिबट्याने पाळीव कुत्रे आणि शेळ्यांना आपले भक्ष बनवले होते. शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती. रब्बी हंगामात रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात पिंजरा लावला अन्...
तर दुसरी घटना इगतपुरी तालुक्यातील भरविर खुर्द गावात घडली आहे. या गावातील शिंदे वस्ती येथे काही दिवसापूर्वी बिबट्याने शेळी व कुत्रे फस्त केले होते. यामुळे या वस्तीवरील धास्तावले असल्याने या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात पिंजरा लावला होता. अखेर हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे दिसल्याने त्यांनी वन विभागास फोन करून बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे अधिकारी भाऊसाहेब राव तसेच त्यांचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली.