एक्स्प्लोर
नाशिकमध्ये महिलांचा डंका, 250 हून अधिक महिला उमेदवार रिंगणात
नाशिक : नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत यंदा महिलांचा डंका आहे. आरक्षणानुसार 50 टक्के महिलांना राजकारणात संधी असली तरी नाशिकमध्ये मात्र यंदा 52 टक्क्यांपेक्षाही अधिक महिलांना राजकीय पक्षांनी उमेदवारी देणं पसंत केलं आहे.
विशेष म्हणजे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या महिलांसोबतच नवख्या सुशिक्षित महिलाही यंदा निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळत आहेत. प्रचारापासून उमेदवारीपर्यंत सगळीकडे महिला आघाडीवर आहेत.
विजयाच्या प्रमुख दावेदार म्हणूनही महिला उमेदवारांकडे पाहिलं जातं आहे. मुख्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या यादीतही पुरुष उमेदवारांपेक्षा यंदा महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे हे विशेष.
नाशिकमधील महिला उमेदवारांसबंधी आकडेवारी :
- शिवसेना (एकूण 122 उमेदवार) – 66 महिला आणि 56 पुरुष
- भाजप (एकूण 120 उमेदवार) – 64 महिला आणि 56 पुरुष
- मनसे (एकूण 102 उमेदवार) – 53 ५३ महिला आणि 49 पुरुष
- काँग्रेस (एकूण 50 उमेदवार) – 26 महिला आणि 24 पुरुष
- राष्ट्रवादी (एकूण 62 उमेदवार) – 30 महिला आणि 32 पुरुष
- माकप (एकूण 16 उमेदवार) – 6 महिला आणि 10 पुरुष
- बसपा (एकूण 36 उमेदवार) – 14 महिला आणि 22 पुरुष
- भारीप (एकूण 18 उमेदवार) – 6 महिला आणि 12 पुरुष
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement