![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्राला सतर्क राहण्याच्या सूचना : डॉ. भारती पवार
संपूर्ण देशात मिझोराममधील काही जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि केरळमध्ये तुलनेने रुग्ण संख्या जास्त असल्याने या राज्यांकडे अधिक लक्ष दिले जात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी एबीपी माझाला दिली.
![ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्राला सतर्क राहण्याच्या सूचना : डॉ. भारती पवार Maharashtra advised to be vigilant as the number of Omaicron patients is increasing, says Dr. Bharti Pawar ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्राला सतर्क राहण्याच्या सूचना : डॉ. भारती पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/19/58f781cd237d19900e345e72e219a695_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : चीन, थायलंड, दक्षिण कोरिया, पूर्वोत्तर भारतात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारला सतर्क राहण्याची सूचना दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. चीन, दक्षिण कोरियासह इतर देशातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा एकदा केंद्र सरकारची चिंता वाढवली आहे. चीनमधील वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आढावा बैठक घेतली. एबीपी माझासोबत साधलेल्या संवादात भारती पवार यांनी कोरोना परिस्थितीबाबत घेतलेल्या आढावा बैठकीची माहिती दिली.
संपूर्ण देशात मिझोराममधील काही जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि केरळमध्ये तुलनेने रुग्ण संख्या जास्त असल्याने या राज्यांकडे अधिक लक्ष दिले जात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी एबीपी माझाला दिली. "महाराष्ट्रामध्ये गृह विलगीकरणात रुग्ण राहतात, त्यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक होत असल्याचे केंद्र सरकारचे निरीक्षण आहे. देशात चौथी लाट येईल किंवा जून महिन्यात रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढेल असा अंदाज बांधला जात आहे. कुठल्या आधावर चर्चां होते माहिती नाही, व्हेरिएन्टसारखा बदलतोय त्यावर लक्ष ठेऊन आहोत. पंचसूत्रीचा वापर केल्यास धोका जाणवणार नाही. सण उत्सवाच्या काळात अधिक काळजी घेण्याची गरज ही त्यांनी व्यक्त केली आहे," असं भारती पवार म्हणाल्या.
अॅक्टिव्ह सर्व्हिलन्स चालू ठेवा, जिनोम सिक्वेसिंग करा, वेगळी लक्षणे दिसली तर लगेच यंत्रणांना कळवा, टेस्टिंग, ट्रीटमेंट, लसीकरणावर भर देतानाच बाहेरच्या देशातील एखादा रुग्ण आढळल्यास रुग्णाची जिनोम सिक्वेसिंग करण्याच्याही सूचना देण्यात आल्या असल्याचं भारती पवार यांनी सांगितलं.
चीनमध्ये नवीन रुग्णांमध्ये वाढ
कोरोनामुळे चीनची अवस्था पुन्हा एकदा वाईट झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून चीनमध्ये कोरोनाचे विक्रमी नवे रुग्ण आढळत आहेत. 14 मार्च रोजी, चीनमध्ये 3602 लोकांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली, जी फेब्रुवारी 2020 नंतरची सर्वाधिक संख्या आहे. 20 फेब्रुवारीपासून चीनमध्ये दररोज कोरोना रुग्ण वाढत आहेत. गेल्या पाच दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर तिथे दररोज एक हजारहून अधिक नवीन रुग्ण समोर येत आहेत. चीनमध्ये 2021 वर्षामध्ये केवळ 15,248 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर 2022 च्या 3 महिन्यांत संक्रमितांची संख्या 23 हजारांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, यूके आणि जर्मनीमध्येही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला आहे.
संबंधित बातम्या
Coronavirus : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सरकार सतर्क, आरोग्यमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
Deltacron : पुन्हा चिंता वाढली, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची धडक, 'डेल्टाक्रॉन'ची लक्षणं काय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)