एक्स्प्लोर
Advertisement
नाशिकमध्ये शेतात विमान कोसळलं, पॅराशूटने तीन जवान खाली उतरले
नाशिकमध्ये लष्कराचं सुखोई 30-210 हे विमान कोसळलं. या अपघातात संपूर्ण विमान जळून खाक झालं आहे.
नाशिक: नाशिकमध्ये लष्कराचं सुखोई 30-210 हे विमान कोसळलं. पिंपळगाव बसवंत येथील वावी ठुशी गावाच्या शिवारात हे लढाऊ विमान अपघातग्रस्त झालं.
या अपघातात संपूर्ण विमान जळून खाक झालं आहे. तांत्रिक बिघाड झाल्यानं विमान कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे या विमानातील तीन जण पॅराशूटने खाली उतरले. आज सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला.
जवानांचा नियमित सराव सुरु होता. त्यावेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान दुर्घटनाग्रस्त झालं. विमानात बिघाड झाल्याचं लक्षात येताच, पायलटने त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश आलं नाही.
अखेर को पायलटसह तिघांनी विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने खाली उड्या मारल्या. सध्या त्यांची प्रकृती सुखरुप आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
शेतात विमान कोसळलं
दरम्यान हे विमान शेतात कोसळल्याने सुदैवाने मोठी हानी झाली नाही. जर हे विमान मानवी वस्तीत किंवा घरावर कोसळलं असतं, तर मोठं नुकसान झालं असतं.
ग्रामस्थांची गर्दी
विमान कोसळल्याचं समजताच पिंपळगाव बसवंत येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. पोलिस आणि जिल्हाधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे.
संबंधित बातम्या
क्यूबात विमान कोसळलं, 105 प्रवाशांचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
Advertisement