एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
‘अजान’ सुरु होताच ढोल वादन बंद, विसर्जन मिरवणुकीत ऐक्याचा संदेश
पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी देखील हिंदू-मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे आभार मानले.
नाशिक : एकीकडे गणपती बाप्पाचा जयजयकार केला म्हणून एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी मुस्लिम बांधवांची माफी मागत नेहमीप्रमाणे चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे नाशिकमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी ‘अजान’ सुरु होताच ढोल वादन थांबवून स्तब्ध उभे राहत हिंदू बांधवांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला.
‘अजान’वेळी ढोल वादन थांबवून, धार्मिक भावनांचा आदर करणाऱ्या गुलालवाडी व्यायामशाळा पथकाचा मुस्लिम बांधवांनी सत्कार केला.
गणपती विसर्जन मिरवणूक सुरु असतानाच दूध बाजार परिसरात गुलालवाडीच लेझीम ढोल पथक वादन करत होतं आणि दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बाजूलाच असलेल्या हेलबावडी मशिदीत अजान सुरु झालं. अजान कानी पडताच या पथकाने ढोल वादन थांबवलं आणि 200 वादक स्तब्ध उभे राहिले. अजान संपताच पुन्हा वादन सुरु करत हे पथक पुढे मार्गस्थ झाले.
गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीतील हे दृश्य पाहून, मुस्लिम बांधवांनी गुलालवाडी पथकाचा सत्कार करण्याचं ठरवत पोलिसांकडे विनंती केली आणि त्यानुसार पोलिस आयुक्त कार्यालयात मशिदीच्या सदस्यांसह मुस्लिम बांधवांनी या पथकाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी देखील हिंदू-मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे आभार मानले. सत्कार होताच दोन्ही धर्माच्या बांधवांनी एकमेकांना पेढे भरवत तोंड गोड करत, ‘आम्ही एक आहोत’ हे दाखवून दिलं.
पाहा ऐक्याचा संदेश देणारा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement