एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

गोदावरी दुथडी भरुन, दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी

नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आला आहे. मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नाशिकमधील गंगापूर धरण जवळपास ओव्हरफ्लो झालं आहे.

नाशिक : नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आला आहे. मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नाशिकमधील गंगापूर धरण जवळपास ओव्हरफ्लो झालं आहे. सध्या गंगापूर धरणातून दिवसाला 5 हजार 100 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीच्या पातळीत मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. नाशिक शहरातील दुतोंडया मारुतीच्या मानेपर्यंत हे पाणी पोहोचलं आहे. तर जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सलग 14 तास झालेल्या संततधार पावसाने नाशिकला पुन्हा एकदा मानवनिर्मित पुराची आठवण करुन दिली आहे. शहरातल्या रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं तर अनेक ठिकाणी ड्रेनेज तुंबले. Nashik_Flood_1 एरव्ही पावसाच्या पाण्याने भरुन वाहणारी गोदावरी नदी शुक्रवारी सकाळी गटारगंगा झाली आहे. जुन्या नाशकातील गटारांचं पाणी रामकुंडाकडे पोहोचल्याने एरव्ही पवित्र मानल्या जाणाऱ्या रामकुंडात दुर्गंधीयुक्त मैला पाण्याचे ओढे वाहत आहे. गोदाकाठची अनेक मंदिरांमध्ये ड्रेनेजचं पाणी गेल्याने नागरिकांचा संताप झाला. शहरातल्या सातपूर, अंबड, शरणपूर रस्ता, जुन्या नाशिकसह अनेक महत्वाच्या भागातील रस्त्यांना नद्यांचं रुप आलं आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीचा फज्जा उडाला. सखल भागातल्या आणि शहरातल्या उपनद्यांच्या लगत असलेल्या वसाहतींमधल्या घरांमध्ये पाणी शिरलं. पावसाचं थैमान वाढल्यावर महापौर रंजना भानसी, आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी तत्काळ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. परंतु ड्रेनेजची साफसफाई न करणाऱ्या, पाण्याचा निचरा न करु शकणाऱ्या विभागांमधील कामचुकार अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याऐवजी प्रशासनाने त्यांना पाठीशी घालण्यातच धन्यता मानली. शहरातील नद्या, नाले, उपनद्यांवर झालेल्या अतिक्रमणांबद्दल या बैठकीत चकार शब्द काढला गेला नाही. नेहमीप्रमाणे पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने काही ठिकाणी अडचण झाली. कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असल्याचं सांगत महापालिकेने वेळ मारुन नेली. Nashik_Flood_3 खरंतर जून महिन्यात झालेल्या विक्रमी पावसाने नाशिककरांना जलप्रलयाचा अनुभव दिला होता. तासाभरात 90 मिमी पाऊस झाल्याने आणि एकाच दिवसांत ड्रेनेजमधून चक्क 46 टन प्लास्टिक कचरा गोळा झाल्याने महापालिकेने या आपत्तीसाठी निसर्ग आणि नाशिककरांना जबाबदार ठरवलं होतं. नाशिककरांनीही त्यावर विश्वास ठेवला. मात्र आता 12 तासात दीडशे मिमी झालेल्या संततधार पावसानंतरही नाशिकची झालेली त्रेधा पाहता महापालिकेने काहीच धडा घेतला नसल्याचंच उघड झालं आहे. जुन्या नाशिकमधला सखल भाग कायम पूरग्रस्त राहतो हे मान्य केलं तरी नाशिकच्या या मानवनिर्मित पुराला इतरही अनेक कारण आहेत. संपूर्ण शहराच पावसाचं पाणी द्वारकावरुन जुन्या नाशिककडे वळवणारी पावसाळी गटार योजना, नद्या उपनद्या नाल्यांवर करण्यात आलेली अवैध बांधकामं, पार्किंग हे ही या आपत्तीला तितकीच जबाबदार आहे. पण महापालिकेची सत्ता असलेले भाजपचे पदाधिकारी आणि महापालिका अधिकारी यातून योग्य तो धडा घेऊन काम करतील तर खरं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget