एक्स्प्लोर
पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या इंजिनिअरला अटक
मुख्य सूत्रधार स्वप्नील मोगल हा इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्गात शिकतो. स्वप्नील हा भाजप महिला आघाडीच्या माजी पदाधिकारी भारती मोगल यांचा मुलगा आहे.

नाशिक : नाशिकमध्ये पेट्रोल पंपवर दरोडा टाकल्याप्रकरणी इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यासह सहा जणांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.
विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला मुख्य सूत्रधार स्वप्नील मोगल हा इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्गात शिकतो. स्वप्नील हा भाजप महिला आघाडीच्या माजी पदाधिकारी भारती मोगल यांचा मुलगा आहे.
हिंदुस्थान पेट्रेलियमच्या पंपावर काम करणारी नीलिमा शिंदे ही महिला कर्मचारी तीन लाख ७६ हजार रुपयांचा भरणा करण्यासाठी बँकेत जात होती. त्यावेळी स्वप्नील आणि त्यांच्या साथीदारानं दुचाकीला धडक देऊन रोख रक्कम असलेली बॅग लांबवली.
नीलिमा शिंदे यांच्याकडून लुटलेले तीन लाख ४५ हजार रुपये, इनोव्हा आणि स्विफ्ट या चारचाकी गाड्यांसह एक पल्सर असा १६ लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. 24 तासाच्याय आत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
VIDEO :
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement



















